Housefull 5 Box Office Collection SAAM TV
मनोरंजन बातम्या

Housefull 5 Box Office Collection: 'हाउसफुल 5' च्या कमाईला ब्रेक लागायला सुरुवात; सातव्या दिवशी बॉक्स ऑफिसवर केला इतक्या कोटींचा गल्ला

Housefull 5 Box Office Collection Day 7: अक्षय कुमारचा बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित चित्रपट ‘हाउसफुल 5’ ने बॉक्स ऑफिसवर दमदार सुरुवात केली होती. या विनोदी चित्रपटाने पहिल्या आठवड्यातच प्रेक्षकांची मनं जिंकली.

Shruti Vilas Kadam

Housefull 5 Box Office Collection Day 7: अक्षय कुमारचा बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित चित्रपट ‘हाउसफुल 5’ ने बॉक्स ऑफिसवर दमदार सुरुवात केली होती. या विनोदी आणि थरारक सस्पेन्सने भरलेल्या चित्रपटाने पहिल्या आठवड्यातच मोठी कमाई करत प्रेक्षकांची मनं जिंकली. मात्र, गुरुवार म्हणजेच सातव्या दिवशी चित्रपटाच्या कमाईत घट झाली असूनही एकूण आकडे बघता चित्रपट यशस्वी ठरतोय.

पहिल्या दिवशी जवळपास २४ कोटी, दुसऱ्या दिवशी ३१ कोटी आणि तिसऱ्या दिवशी ३२.५ कोटी रुपयांची कमाई करत 'हाउसफुल 5' ने शानदार ओपनिंग मिळवली. चौथ्या ते सहाव्या दिवशी काहीसा गतीने घसरत हा आकडा १३ कोटी, ११.२५ कोटी आणि ८ कोटी रुपयांवर आला. सातव्या दिवशी म्हणजेच गुरुवारी चित्रपटाने ६.७५ कोटी रुपये कमावले.

यामुळे एकूण सात दिवसांत ‘हाउसफुल 5’ ची एकूण कमाई 127 कोटींच्या घरात पोहोचली आहे. ही माहिती Box Office tracking प्लॅटफॉर्म Sacnilk च्या आकडेवारीवरून समोर आली आहे. गुरुवारी कमाईत थोडी घट झाली असली, तरी अक्षय कुमारसाठी हा चित्रपट विशेष आहे कारण त्याच्या ‘100 कोटी क्लब’मधील 18व्या चित्रपटाचं स्थान यामुळे निश्चित झालं आहे.

या चित्रपटात अक्षय कुमार, रितेश देशमुख, अभिषेक बच्चन, संजय दत्त जॉकी श्रॉफ यांच्या भूमिका असून, ‘Housefull 5A’ आणि ‘Housefull 5B’ या दोन वेगळ्या व्हर्जनमध्ये हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला आहे. यामुळे प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली आणि वेगवेगळ्या सस्पेन्स व ट्विस्ट्सने भरलेली कहाणी पाहायला मिळाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News : तुला घरी नेण्यासाठी कुणी आलं नाही का? पाचवीतल्या चिमुकलीसोबत शिक्षकाचं किळसवाणं कृत्य, रत्नागिरीत खळबळ

Raj Thackeray : माझ्या परवानगीशिवाय कोणाशी बोलू नका, राज ठाकरे यांचा पदाधिकाऱ्यांना आदेश

Pune News : चिमुरडीचा जीव वाचवणारा, फायर ब्रिगेडचा हिरो

Morning Weight loss Drink: रिकाम्या पोटी प्या 'हे' मॉर्निंग सुपरड्रिंक, वजन होईल कमी

मीरारोडला गर्जला मराठी; दिवसभरात नेमकं काय घडलं? मराठीचा एल्गार, मोर्चापूर्वी काय घडलं?

SCROLL FOR NEXT