Housefull 5  SAAM TV
मनोरंजन बातम्या

अक्षय कुमारच्या 'Housefull 5' चा बोलबाला; पहिल्याच दिवशी 'या' सुपरहिट चित्रपटांना टाकले मागे, कलेक्शनचा आकडा किती?

Housefull 5 Box Office Collection Day 1: अक्षय कुमारच्या 'हाऊसफुल 5' चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. पहिल्या दिवसाची कमाई किती, जाणून घेऊयात.

Shreya Maskar

बहुप्रतिक्षित चित्रपट 'हाऊसफुल 5' (Housefull 5) काल (6 जून) ला प्रेक्षकांच्या भेटीला आहे. चित्रपट पाहण्यासाठी थिएटरमध्ये प्रेक्षकांची गर्दी पाहायला मिळाली. या चित्रपटाच्या ट्रेलर आणि गाण्याने मिडिया सोशल मीडियावर धुमाकूळ घातला होता. 'हाऊसफुल 5'ची निर्मिती साजिद नाडियादवाला यांनी केली आहे. तर चित्रपटाचे दिग्दर्शन तरुण मनसुखानी यांनी केले आहे. 'हाऊसफुल 5' चे पहिल्या दिवसाचे कलेक्शन जाणून घेऊयात.

'हाऊसफुल 5' बॉक्स ऑफिसवर कलेक्शन दिवस 1

तगडी स्टारकास्ट असलेला 'हाऊसफुल 5' नुकताच रिलीज झाला आहे. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी बंपर कमाई केली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, अक्षय कुमारच्या (Akshay Kumar) 'हाऊसफुल 5' ने पहिल्या दिवशी तब्बल 23 कोटींचा व्यवसाय केला आहे. 'हाऊसफुल 5' अक्षय कुमारच्याच दोन चित्रपटांना मागे टाकले आहे. 'हाऊसफुल 5' चित्रपटाने अक्षय कुमारच्या 'हाऊसफुल 4' आणि 'स्काय फोर्स' या चित्रपटाला मागे टाकले आहे.

'हाऊसफुल 4' 2019मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. मीडिया रिपोर्टनुसार, या चित्रपटाने रिलीजच्या पहिल्या दिवशी 19.08 कोटी रुपयांची कमाई केली होती. तर 2025 साली रिलीज झालेल्या 'स्काय फोर्स' चित्रपटाने पहिल्या दिवशी 11.50 कोटी रुपयांची कमाई केली आहे. भविष्यात 'हाऊसफुल 5' बक्कळ कमाई करेल असे चित्र दिसत आहे. तसेच 'हाऊसफुल 5' पुढे अनेक मोठ्या चित्रपटांचे रेकॉर्ड ब्रेक असे बोले जात आहे.

'हाऊसफुल 5' स्टारकास्ट

'हाऊसफुल 5'मध्ये बॉलिवूडच्या तगडे कलाकार अक्षय कुमार, रितेश देशमुख ,अभिषेक बच्चन, जॅकलीन फर्नांडिस, संजय दत्त ,नर्गिस फाखरी, फरदीन खान, जॅकी श्रॉफ झळकले आहेत. तर मराठमोळा अभिनेता श्रेयस तळपदे आणि मराठी दिग्गज अभिनेते नाना पाटेकर यांनी आपल्या कॉमेडीने प्रेक्षकांना खूप हसवले आहे.

'हाऊसफुल 5' हा 'हाऊसफुल' फ्रँचायझीचा 5 वा भाग आहे. 'हाऊसफुल 5'मध्येही कॉमेडी आणि ॲक्शन पाहायला मिळणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार, 'हाऊसफुल 5' चित्रपटाचे बजेट 375 कोटी रुपये आहे. 'हाऊसफुल 5' चित्रपट अमेझॉन प्राइम व्हिडिओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहता येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

उद्धव ठाकरेंचा 'जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात'चा VIDEO कुठला अन् कधीचा? महाराष्ट्र की गुजरात? वाचा सविस्तर...

Shubman Gill: बाल बाल बचावला गिल; ब्रूकनं मारलेला चेंडू लागला थेट शुबमनच्या डोक्याला|Video Viral

Maharashtra Live News Update: पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑर्डर ऑफ द रिपब्लिकने सन्मानित

Badlapur Firing : बदलापूर गोळीबार प्रकरणाला नवं वळण; गाळीबारामागे शिवसेना पदाधिकाऱ्याचा हात?

Eknath Shinde : 'जय गुजरात'च्या घोषणेनंतर एकनाथ शिंदेंचं स्पष्टीकरण, उद्धव ठाकरेंचा VIDEO दाखवत विरोधकांना प्रत्युत्तर

SCROLL FOR NEXT