Homebound  SAAM TV
मनोरंजन बातम्या

जान्हवी- ईशानच्या Homebound चा ऑस्करमध्ये बोलबाला; पण बॉक्स ऑफिसवर फेल, किती केली कमाई?

Homebound Box Office Collection Day 1 : जान्हवी कपूर आणि ईशान खट्टरचा 'होमबाउंड' चित्रपट रिलीज झाला आहे. चित्रपटाने पहिल्या दिवशी किती रुपयांचा व्यवसाय केला, जाणून घेऊयात.

Shreya Maskar

'होमबाउंड' चित्रपट 26 सप्टेंबरला रिलीज झाला आहे.

'होमबाउंड' चित्रपटात जान्हवी कपूर, ईशान खट्टर आणि विशाल जेठवा मुख्य भूमिकेत झळकले आहेत.

'होमबाउंड' चे दिग्दर्शन नीरज घायवान यांनी केले आहे.

सध्या सर्वत्र जान्हवी कपूरच्या 'होमबाउंड' (Homebound ) चित्रपटाची चर्चा पाहायला मिळत आहे. 'होमबाउंड' चित्रपट काल (26 सप्टेंबर) ला रिलीज झाला आहे. भारताने ऑस्करसाठी 'होमबाउंड' या चित्रपटाची निवड केली. ऑस्कर्समध्ये 'होमबाउंड'चा बोलबाला पाहायला मिळाला असला तरी बॉक्स ऑफिस मात्र चित्रपटाने निराशाजनक कामगिरी केली आहे. पहिल्या दिवशी चित्रपटाने फक्त लाखांमध्ये कमाई केली आहे. ओपनिंग डे चे कलेक्शन जाणून घेऊयात.

'होमबाउंड' बॉक्स ऑफिस कलेक्शन

सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, 'होमबाउंड' चित्रपटाने पहिल्या दिवशी फक्त 30 लाख रुपयांची कमाई केली आहे. या चित्रपटाची कथा दोन मित्रांच्या स्वप्नाभोवती फिरते. उत्तर भारतातील एका छोट्या गावात दोन मित्र राहत असतात. दोघेही पोलिसांची नोकरी मिळविण्यासाठी धडपडत करताना चित्रपटात पाहायला मिळतात. त्यांच्या वाटेला आलेली निराशा, त्याची मेहनत, त्यांना मिळालेला आदर हे सर्व चित्रपटातून पाहायला मिळते.

'होमबाउंड' स्टारकास्ट

'होमबाउंड' चित्रपटात जान्हवी कपूर (Janhvi Kapoor ) , ईशान खट्टर (Ishaan Khatter) आणि विशाल जेठवा मुख्य भूमिकेत झळकले आहेत. यांच्या अभिनयाने चित्रपटाला चारचाँद लावले आहेत. 'होमबाउंड' चे दिग्दर्शन नीरज घायवान यांनी केले आहे. वीकेंडला 'होमबाउंड' चित्रपट किती कोटींचा व्यवसाय करतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

2018मध्ये ईशान खट्टर आणि जान्हवी कपूरचा 'धडक' चित्रपट रिलीज झाला होता. 'धडक' च्या तुलनेत 'होमबाउंड'ने पहिल्या दिवशी खूपच कमी कमाई केली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, 'धडक'ने रिलीजच्या पहिल्या दिवशी 8.71 कोटी रुपयांची कमाई केली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर खूप गाजला. तसेच चित्रपटातील गाणी आजही सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Soft Idli Recipe: इडली फुगतच नाही? बॅटरमध्ये घाला '१' पदार्थ, सॉफ्ट - साऊथ स्टाईल इडलीचं सिक्रेट

BSNL Prepaid Plan: स्वस्तात दमदार ऑफर! बीएसएनएलच्या 225 रुपयांच्या प्लॅनमध्ये मिळवा दररोज 2.5GB डेटा आणि अनेक फायदे

Rule Change : १ ऑक्टोबरपासून ५ नियम बदलणार, तुमच्या खिशावर होणार परिणाम, वाचा काय होणार बदल

Maharashtra Live News Update: शेतकऱ्याने घेतले तहसील कार्यालयातच विष; प्रकृती गंभीर

'ही काय स्टंटबाजी वाटते का?' कारवरील हल्ल्यानंतर लक्ष्मण हाके संतापले; मनोज जरांगेंना सुनावलं

SCROLL FOR NEXT