Tom Cruise Stunt in Mission Impossible- Dead Reckoning Part One Twitter/@DiscussingFilm
मनोरंजन बातम्या

Tom Cruise Stunt : कमाल झाली ! एका दिवसात २९ वेळा स्काय डायव्हिंग, हॉलिवूड अभिनेत्याचा कारनामा

Tom Cruise Stunt In Mission Impossible 7 : मिशन: इम्पॉसिबल 7 मध्ये टॉमची सहकलाकार असलेल्या हेली एटवेलने अलीकडेच टॉम क्रूज संबंधित एक किस्सा सांगितला.

Pooja Dange

Tom Cruise Did Skydiving 29 Time In A Day : 1996 मध्ये 'मिशन: इम्पॉसिबल' या सीरीजची सुरुवात झाली. टॉम क्रूजने प्रत्येक सीरीजमध्ये भयंकर स्टंट केले आहेत. प्रत्येक सीरीजमध्ये त्याच्या स्टंटची लेव्हल वाढतच गेली. आता सीरीजचा सातवा भाग येत आहे.

मिशन: इम्पॉसिबल 7 मध्ये टॉमची सहकलाकार असलेल्या हेली एटवेलने अलीकडेच टॉम क्रूज संबंधित एक किस्सा सांगितला. अत्यंत धोकादायक स्टंट केल्यानंतरही तो खूप शांत असतो, असे हेली एजवेल म्हणाली.

Radiotimes.com शी बोलताना हेलीने सांगितले की, टॉम कोणताही स्टंट करताना घाबरत नाही. हे खूप सर्प्राइजिंग आहे. त्याने एकदा एक प्रसंग सांगितला, 'एकदा आम्ही सगळे टॉमच्या घरी जेवायला गेलो होतो. तो आम्हाला विचारत होता की आमचा दिवस कसा गेला. आम्ही चित्रपटाबद्दल बोलत होतो. तेव्हा टॉम म्हणाला की त्याचाही दिवस चांगला गेला. तो पुढे म्हणाला की मी आज जवळपास 29 वेळा स्कायडायव्हिंग केले.'

स्कायडायव्हिंगमध्ये म्हणजे तुम्हाला विमानातून आकाशात नेले जाते. सरासरी उंची सुमारे 10,000 फूट एवढी असते. एवढ्या उंचीवर गेल्यावर विमानातून पॅराशूट घेऊन उडी मारायची असते. (Latest Entertainment News)

टॉमने सांगितले की त्याने एका दिवसात 29 वेळा आकाशातून उडी मारली. हेली म्हणते की, 'टॉमचे स्टंट करणे भीतीदायक आहे. पण या सगळ्यात तो इतका शांत कसा राहतो, याच मला टेन्शन येत. तो खूपच शांत असतो.'

'मिशन: इम्पॉसिबल 7' मध्ये टॉम त्याच्या कारकिर्दीतील सर्वात भयंकर स्टंट करणार आहे. निर्मात्यांनी त्याच्या पहिल्या स्टंटच्या मेकिंगचा व्हिडिओ देखील शेअर केला होता. जिथे तो खड्ड्यातून मोटार सायकल घेऊन उडी मारत आहे.

स्टंटच्या दिवशी त्याने पाच वेळा या स्टंटचा सराव केला होता. आता चित्रपट निर्मात्यांनी आणखी एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये टॉमचा चित्रपटातील दुसरा स्टंट पाहायला मिळतो. मेकिंगच्या या व्हिडिओमध्ये तो स्पीड फ्लायिंग करताना दिसत आहे.

मुळात स्पीड फ्लाइंगमध्ये, एखादी व्यक्ती पॅराशूटने उडी मारते आणि वेगवेगळ्या दिशांना झुलत खाली उतरतो. टॉम म्हणतो की तो 80 किलोमीटर प्रतितास वेगाने खडकांदरम्यान झुलत होता. इथे प्रकरण फक्त स्टंटपुरते मर्यादित नव्हते. त्याला एका विशिष्ट दिशेने उड्डाण करायचे होते. जेणेकरून त्याचे शॉट्स कॅमेऱ्यात व्यवस्थित येतील.

खडक आणि कॅमेरा दोन्हीची काळजी घ्यावी लागत होती. टॉमने सर्व गोष्टींची काळजी घेतली आणि स्टंट्स उत्तम केला. 'मिशन: इम्पॉसिबल 7' 12 जुलै रोजी जगभरातील थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Modi: मविआला देशापेक्षा आघाडी महत्वाची; अखेरच्या प्रचारसभेत पंतप्रधान मोदींनी विरोधकांचा घेतला समाचार

Rahul Gandhi: महाराष्ट्रातील बेरोजगारीला गुजरात जबाबदार? राहुल गांधींनी काढली उद्योगांची कुंडली

Maharashtra News Live Updates: ५ कोटींचे सोने आणि १७ लाखांची चांदी जप्त, अमरावतीच्या नागपुरी गेट पोलिसांची कारवाई

Assembly Election: कामठीचं महाभारत ! कामठीत चंद्रशेखर बावनकुळे चौकार मारणार?

'Jodha Akbar' चित्रपटाचे शूटिंग कोणत्या किल्ल्यावर झाले? अनुभवाल डोळ्यांचे पारणे फेडणारे सौंदर्य

SCROLL FOR NEXT