Huma Qureshi On Religion : मला कधीही वाटले नाही मी मुस्लिम आहे... भारतातील परिस्थितीवर हुमा कुरेशीने दिली प्रतिक्रिया

Huma Qureshi On Muslim In India : एका मुलाखती हुमा कुरेशीने सांगितले की, ती मुस्लिम कुटुंबातून आली आहे हे तिला कधीच जाणवले नाही.
Huma Qureshi On Religion
Huma Qureshi On ReligionInstagram @iamhumaq
Published On

Huma Qureshi Share Her Feeling : अभिनेत्री हुमा कुरेशी सध्या तिच्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. दरम्यान एका मुलाखती हुमा कुरेशीने सांगितले की, ती मुस्लिम कुटुंबातून आली आहे हे तिला कधीच जाणवले नाही. त्याच्याशी कधीही भेदभाव केला नाही.

हुमाला मुलाखतीत विचारण्यात आले की भारतात मुस्लिमांची स्थिती कशी आहे ? अलीकडच्या काळात भारतीय मुस्लिमांना कोणत्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे ?

या प्रश्नाचे उत्तर देत हुमा म्हणाली की, तिला कधीही दुहेरी वागणूक दिली गेली नाही. माझे वडील 50 वर्षांपासून दिल्लीत रेस्टॉरंट चालवत आहेत. तिच्या कुटुंबीयांना असे कधीच वाटले नाही. (Latest Entertainment News)

Huma Qureshi On Religion
Chanakya Poster : महाराष्ट्राचे खरे चाणक्य शरद पवारसाहेब... निर्मात्यांनी चित्रपटाचा पोस्टर शेअर करत दिला पाठिंबा

हुमा म्हणाली, 'मी वैयक्तिक अनुभवावरून सांगते की मला कधीच वेगळी वागणुक मिळाली नाही. आज तकशी संवाद साधताना हुमा कुरेशी म्हणाली, 'मला कधीच जाणवले नाही की मी मुस्लिम आहे किंवा मी वेगळी आहे. माझे वडील दिल्लीच्या कैलास कॉलनीत सलीम हे रेस्टॉरंट चालवतात.

मी माझ्या वैयक्तिक अनुभवावरून सांगतो की मला कधीच काही वेगळे वाटले नाही. परंतु काही लोकांना असे वाटू शकते. माझ्या मते प्रश्न विचारले गेले पाहिजे आणि सर्व सरकारांनी त्याची उत्तर देखील दिले पाहिजेत.'

पंतप्रधान मोदी नुकतेच अमेरिकेला गेले होते. त्यांच्या या अमेरिकन दौऱ्यात भारतातील मुस्लिमांची स्थिती पूर्वीपेक्षा चांगली आहे का, हा प्रश्न उपस्थित करण्यात आला. हा प्रश्न अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी प्रश्न उपस्थित केला होता.

त्यावर उत्तर देत पीएम मोदींनी म्हटले होते की भारतात जात, पंथ आणि धर्माला अशा कोणत्याही भेदभावाला स्थान नाही. भारत हा एक लोकतंत्र देश आहे आणि तुम्ही त्याला लोकतंत्र देश म्हणता त्यामुळे पक्षपाताचा प्रश्नच येत नाही.

हुमा कुरेशीला हा संदर्भा देत प्रश्न विचारण्यात आला. भारतात असुरक्षितता किंवा कोणतीही भीती वाटत नसल्याचे तिने स्पष्टपणे सांगितले.

आपण गेल्या काही वर्षांत पाहिले आहे की अनेक अभिनेते आणि चित्रपट निर्माते भारतातील मुस्लिमांच्या स्थितीवर सरकारला प्रश्न विचारत आहेत. मात्र, त्यामागे त्यांची स्वतःची विचारधाराही आहे.

Huma Qureshi On Religion
Arundhati Teach Poem : मधुराणी लावतेय शाळकरी मुलांना कवितेची गोडी ; लेकीच्या शाळेत जाऊन शिकवली कविता

हुमा कुरेशीने 2012 च्या गँग्स ऑफ वासेपूर चित्रपटातून पदार्पण केले होते. हुमाच्या कुटुंबाचा चित्रपटसृष्टीशी काहीच संबंध नाही. हुमाने आधी सांगितल्याप्रमाणे तिच्या वडिलांचा फूड बिजनेस आहे. दिल्लीत त्यांचे सलीम रेस्टॉरंटच्या नावाच्या अनेक फ्रँचायझी आहेत. नुकतीच त्याची एक बरंच मुंबईत देखील सुरू झाली आहे.

हुमाच्या वडिलांची इच्छा होती की हुमाने फॅमिली बिजनेस सांभाळावा. मात्र, हुमाचे मत वेगळे होते. हुमा मॉडेलिंग करण्यासाठी मुंबईत आली. तिच्यासोबाबत तिचा भाऊ साकिब सलीमही मुंबईत आला. साकिबही आता प्रसिद्ध अभिनेता आहे.

हुमाने अभिषेक बच्चनसोबत पहिली जाहिरात व्हिडिओ शूट केला. तेव्हा तिला ५ हजार रुपये मानधन मिळाले होते. जेव्हा अनुराग कश्यपने तिला गँग्स ऑफ वासेपूरसाठी साइन केले तेव्हा हुमाचे नशीब पालटले.

गँग्स ऑफ वासेपूर चित्रपटाच्या दोन्ही भागांमध्ये ती दिसली. हुमाने या चित्रपटात एका बिहारी मुलीची भूमिका साकारली होती. ती त्या भूमिकेशी इतकी एकनिष्ठ होती की लोक तिला बिहारी समजू लागले होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com