Arundhati Teach Poem : मधुराणी लावतेय शाळकरी मुलांना कवितेची गोडी ; लेकीच्या शाळेत जाऊन शिकवली कविता

Madhurani Gokhale Prabhulkar Video : मधुराणी लेकीच्या शाळेत गेल्याचे तिने व्हिडीओच्या माध्यामातून सांगितले आहे
Madhurani Gokhale Prabhulkar teaches Poem
Madhurani Gokhale Prabhulkar teaches PoemSaam Tv
Published On

Madhurani Gokhale Prabhulkar Singing Poem : आई कुठे काय करते ही मालिका महाराष्ट्राच्या घराघरात पाहिली जाते. या मालिकेतील आई अरुंधती म्हणजे मधुराणी गोखले प्रभुलकरने प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केले आहे.

मधुराणी सोशल मीडियावर सक्रिय आहे. तसेच तिच्या जीवनातील अपडेट शेअर करत असते. काही दिवसांपूर्वी मधुराणी लेकीसोबत ऑस्ट्रेलियाला गेली होती. त्याचे सर्व अपडेट तिने सोशल मीडियावर शेअर केले होते.

आता मधुराणी लेकीच्या शाळेत गेल्याचे तिने व्हिडीओच्या माध्यामातून सांगितले आहे. तिने लेकीच्या शाळेत जाऊन मुलांना कविता देखील शिकवल्या आहेत. (Arundhati)

Madhurani Gokhale Prabhulkar teaches Poem
Kartik Aaryan Buy Luxury Apartment : सत्यप्रेम की कथाच्या यशानंतर कार्तिक आर्यनची नवी भरारी ; मुंबई घेतले कोट्यवधींचे घर

मधुराणीने तिचा हा अनुभव सोशल मीडियावर शेअर केला आहे. तिने व्हिडीओ शेअर करत लिहिले आहे, 'स्वरालीच्या 'गोकुळ' शाळेत काल कविता शिकवायला गेले होते. कुसुमाग्रज, ग. दि. मा., शांता शेळके, विंदा, नलेश पाटील अशा मोठमोठ्या कवींच्या कविता अर्थ समजून घेत घेत आम्ही एकत्र म्हटल्या.

मुलांचा उत्साह, प्रत्येक कवितेतून अर्थ उलगडताना त्यांचे कुतूहलाने लुकलूकणारे डोळे, 'अजून एक, अजून एक कविता' अशी त्यांची आर्जवं... हे सगळंच फार प्रेमात पडणारं होतं.

याच वयात मुलांना आपण कवितेची गोडी लावली, त्यातून मिळणाऱ्या निर्भेळ आनंदाची ओळख करून दिली तर आयुष्यातल्या बऱ्या वाईट प्रसंगात मनावर फुंकर घालणारी जन्मभराची एक सखीच मिळवून दिली।

मुलांबरोबर कविता गायला हव्यात... त्यातला निर्मळ आनंद असा लुटत राहायला हवा.

गोकुळच्या संचालिका डॉ. ज्योत्स्ना पेठकर हिनी माझ्या मागे लागून माझ्याकडून हे करून घेतलं .... या काव्यप्रेमीचे आभार.'

मधुराणी या मुलांना 'पाऊस आला गं आला गं' ही कविती शिकवत आहे. तिचा हा व्हिडीओ तिच्या चाहत्यांनी खुप आवडला आहे. कमेंट करत नेटकरी तिचे कौतुक करत आहेत.

'किती छान वाटत आहे ऐकायला... आणि हे हल्लीच्या English बडबडगीत पेक्षा किती तरी छान आहे ....'

'तुमची कविता लहनांनमध्येच नाहीतर मोठ्यांमधे सुद्धा कवितेची गोडी निर्माण करू शकते'

'राणी मॅडम मला पण ह्या शाळेत यायला आवडेल खूप.' अशा कमेंट मधुराणीसाठी फॅन करत आहेत. (Latest Entertainment News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com