Michael Douglas Saam Tv
मनोरंजन बातम्या

Michael Douglas: हॉलिवूड स्टारला 'सत्यजित रे लाइफटाइम अवॉर्ड' जाहीर, अनुराग ठाकूर यांची मोठी घोषणा

Satyajit Ray Excellence Award: गोव्यामध्ये 54 व्या आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवलमध्ये मायकल डग्लसला प्रतिष्ठित सत्यजित रे एक्सलन्स इन फिल्म लाइफटाइम पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे.

Priya More

Hollywood Star Michael Douglas:

हॉलिवूड (Hollywood) अभिनेता आणि निर्माता मायकल डग्लसला (Michael Douglas) भारताकडून सन्मानित केले जाणार आहे. मायकलला गोव्यामध्ये आयोजित करण्यात आलेल्या 54 व्या आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवलमध्ये 'सत्यजित रे लाइफटाइम अचिव्हमेंट अवॉर्ड' (satyajit ray excellence award) देऊन गौरविण्यात येणार आहे. भारताचे माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर (Minister Anurag Thakur) यांनी शुक्रवारी याबाबतची घोषणा केली.

यंदा गोव्यामध्ये 54 व्या आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवलचे आयोजन केले जाणार आहे. या फिल्म फेस्टिवलमध्ये हॉलिवूड अभिनेता मायकल डग्लसला प्रतिष्ठित सत्यजित रे एक्सलन्स इन फिल्म लाइफटाइम पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. अनुराग ठाकूर यांनी ट्वीट करत याबाबतची माहिती दिली आहे. हा पुरस्कार जाहीर होताच मायकल डग्लस यांच्यावर सध्या शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

अनुराग ठाकूर यांनी एक्स म्हणजेच ट्विटरवर पोस्ट करत ही घोषणा केली आहे. त्यांनी सांगितले की,'मला हे जाहीर करताना अतिशय आनंद होत आहे की, हॉलिवूडचा महान अभिनेता आणि निर्माता मायकल डग्लस यांना 54 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात प्रतिष्ठित सत्यजित रे एक्सलन्स इन फिल्म लाइफटाइम पुरस्काराने सन्मानित केले जाईल'

त्यांनी पुढे सांगितले की, 'आपल्या देशाबद्दलचे मायकल यांचे अतोनात प्रेम सर्वज्ञात आहे. IFFI54 मध्ये आमच्या समृद्ध सिनेमॅटिक संस्कृती आणि अनोख्या परंपरांचे प्रदर्शन करण्यासाठी दक्षिण आशियातील प्रमुख चित्रपट महोत्सवात आम्ही मायकल, कॅथरीन झेटा जोन्स आणि त्यांच्या मुलाचे स्वागत करण्यासाठी उत्सुक आहोत.'

सत्यजित रे जीवनगौरव पुरस्कार अशा व्यक्तींना प्रदान केला जातो ज्यांच्या विलक्षण योगदानामुळे चित्रपटसृष्टीचे जग लक्षणीयरित्या समृद्ध आणि प्रगत झाले आहे. आता हा पुरस्कार हॉलिवूड स्टार मायकल डग्लसला दिला जाणार आहे. आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवलचे हे 54 वे वर्षे आहे. गोव्यामध्ये 20 नोव्हेंबर ते 28 नोव्हेंबर दरम्यान हा फिल्म फेस्टिवल होणार आहे.

दरम्यान, ७९ वर्षीय अमेरिकन अभिनेता मायकेल डग्लस हे दोन वेळा ऑस्कर विजेते आणि पाच वेळा गोल्डन ग्लोब पुरस्कार विजेते आहे. या अभिनेत्याने 1966 मध्ये 'कास्ट अ जायंट शॅडो' मधून आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली. 'वॉल स्ट्रीट' (1987), 'बेसिक इन्स्टिंक्ट' (1992), 'फॉलिंग डाउन' (1993), 'द अमेरिकन प्रेसिडेंट' (1995), 'ट्रॅफिक' (2000) आणि 'बिहाइंड' या चित्रपटांमधील त्यांच्या काही लोकप्रिय कामांचा समावेश आहे. अभिनयाव्यतिरिक्त, त्याने 'वन फ्लू ओव्हर द कुकूज नेस्ट' (1975), 'द चायना सिंड्रोम' (1979), आणि 'द गेम' (1999) सारख्या अनेक समीक्षकांनी प्रशंसित केलेल्या चित्रपटांची निर्मिती केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Devendra Fadnavis : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचा आशीर्वाद मलाच मिळाला; देवेंद्र फडणवीस असं का म्हणाले?

Amarnath Yatra Bus Accident : अमरनाथ यात्रेला जाणाऱ्या भाविकांच्या वाहनांचा भीषण अपघात; 5 बस एकमेकांना आदळल्या, परिसरात खळबळ

Ashadhi Ekadashi: आषाढी एकादशीच्या उपवासात चुकूनही खाऊ नका हे ५ पदार्थ

Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचा वापर केला; ते युज अँड थ्रो करणारे, मेळाव्यानंतर भाजप नेत्याची जळजळीत टीका

Actress Father Death: प्रसिद्ध अभिनेत्रीच्या वडिलांवर गोळीबार, रूग्णालयात येत धाडधाड गोळ्या झाडल्या; प्रकृती चिंताजनक

SCROLL FOR NEXT