Taraja Ramsess Died Saam Tv
मनोरंजन बातम्या

Black Panther Stuntman Died: दुर्दैवी! 'ब्लॅक पँथर' फेम स्टंटमॅनचा कार अपघातात मृत्यू, मृतांमध्ये ३ मुलांचाही समावेश

Taraja Ramsess Died After Car Accident: ताराजा रॅमसेसची आई अकिली रॅमसेस यांनी सोशल मीडियाच्या (Social Media) माध्यमातून ही माहिती दिली आहे.

Priya More

Taraja Ramsess Died:

'ब्लॅक पँथर'चा (Black Panther) स्टंटमॅन ताराजा रॅमसेसच्या (Taraja Ramsess) चाहत्यांना धक्का देणारी माहिती समोर आली आहे. ताराजा रॅमसेसचा भीषण अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातामध्ये ताराजा रॅमसेससोबत त्याच्या तीन मुलांनाही आपला जीव गमवावा लागला आहे. ताराजा रॅमसेसची आई अकिली रॅमसेस यांनी सोशल मीडियाच्या (Social Media) माध्यमातून ही माहिती दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ताराजा रॅमसेसच्या कारला अपघात झाल्याची घटना ३१ ऑक्टोबरला घडली आहे. ताराजा रॅमसेसच्या कारला ट्रॅक्टर-ट्रेलरने जोरदार धडक दिली. ताराजा रॅमसेस कारमधून आपल्या ५ मुलांसह प्रवास करत होता. त्याचेवळी हा भीषण अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की यामध्ये ताराजासह त्याच्या तीन मुलांचा देखील मृत्यू झाला आहे.

४ दिवसांपूर्वी अकिली यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर त्यांचा मुलगा तारजा रॅमसेससोबतचा एक फोटो शेअर करून त्यांच्या निधनाची बातमी दिली होती. त्यांनी या पोस्टमध्ये असे लिहिले होते की, 'माझा सुंदर, प्रेमळ, प्रतिभावान मुलगा ताराजा, माझी दोन नातवंडे, त्यांची 13 वर्षांची मुलगी सुंदरी आणि त्यांची 8 आठवड्यांची नवजात मुलगी फुजिबो एका भीषण अपघातात ठार झाली.'

अकिलीने पुढे असे लिहिले की, 'माझा नातू, रॅमसेसचा 10 वर्षांचा मुलगा, किसासी, "सॉस द बॉस", लाइफ सपोर्टवर आहे. माझे दोन नातवंडं या अपघातातून बचावले आहेत. तीन वर्षांच्या शाझियावर अजूनही रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पण किरकोळ दुखापतींमुळे तिची प्रकृती सुधारत आहे. जो कोणी ताराजाला भेटला आहे आणि ओळखत आहे. त्यांना माहिती आहे की, ताराजा किती खास होता. तो खूपच प्रेमळ होता. सर्वात जास्त तो त्याच्या मुलांवर प्रेम करत होता. त्याला मार्शल आर्ट्स, मोटारसायकल आणि चित्रपट निर्मितीशी संबंधित सर्व गोष्टी आवडत होत्या.'

ताराजा रॅमसेस फक्त 'मार्वल सिनेमॅटिक युनिव्हर्स' (MCU) मधील त्याच्या स्टंटमुळे प्रसिद्ध नाही तर तो 'Avengers: Endgame' आणि 'Black Panther: Wakanda Forever' सारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांसाठी देखील प्रसिद्ध होता. याशिवाय त्याने 'द सुसाईड स्क्वॉड', 'क्रीड III', 'द हंगर गेम्स: कॅचिंग फायर', 'एमेंसिपेशन' आणि 'द हार्डर दे फॉल' यासारख्या चित्रपटांमध्येही काम केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hair Care Tips: हे 'काळे पाणी' तुमच्या केसांच्या सर्व समस्या करतील मूळापासून दूर, एकदा नक्की ट्राय करुन पाहा

Mumbaicha Raja : 'मुंबईचा राजा...' म्हणू नका! रोहित शर्मानं चाहत्यांना रोखलं, VIDEO

Weight Gain : जेवणाच्या या चुकीच्या सवयींमुळे वाढेल वजन; वेळीच व्हा सावध

Sevai Kheer Recipe : सणासुदीला खास बनवा शेवयांची खीर, एक घास खाताच मन होईल तृप्त

Maharashtra Live News Update: पुण्यातील देविका हाइट्स इमारतीच्या टेरेसवरील टॉवर केबिनला आग

SCROLL FOR NEXT