अडल्ट फिल्म अभिनेत्री सोफिया लिओनीच्या (Sophia Leone) चाहत्यांना धक्का देणारा बातमी समोर आली आहे. सोफिया लिओनीचे वयाच्या २६ व्या वर्षी निधन झालं. यूएसमधील (US) सोफिया राहत असलेल्या अपार्टमेंटमध्ये तिचा मृतदेह आढळून आला. सोफियाच्या निधनाचे वृत्त कळताच तिच्या कुटुंबीयांना आणि चाहत्यांना मोठा धक्का बसलाय. यूएस पोलिसांकडून (US Police) याप्रकरणाचा तपास सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मागच्या आठवड्यामध्ये म्हणजे १ मार्चला सोफिया राहत असलेल्या अपार्टमेंटमध्ये तिचा मृतदेह आढळला. सोफियाचे कुटुंबीय तिला सतत फोन करत होते. पण तिच्याशी काहीच संपर्क होत नव्हता. त्यानंतर सोफियाचा मृतदेह तिच्याच घरामध्ये आढळून आला. अभिनेत्रीचे सावत्र वडील माइक रोमेरो यांनी माध्यमांना ही माहिती दिली.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, सोफिया गेल्या आठवड्यात तिच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सक्रिय दिसली होती. तिने सोशल मीडियावर काही पोस्ट अपलोड केल्या होत्या. सोफियाच्या सावत्र वडिलांनी सांगितले की, 'तिच्या आई आणि कुटुंबाच्या वतीने मी आमच्या प्रिय सोफियाच्या निधनाची बातमी सांगतोय. स्थानिक पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. सोफियाला फिरण्याची प्रचंड आवड होती. त्याचसोबत तिला आपल्या जवळच्या व्यक्तींना आनंदी ठेवायला खूप आवडत होते.' सोफियाच्या आकस्मिक मृत्यूने तिचे कुटुंब आणि मित्र यांना खूप मोठा धक्का बसला.'
दरम्यान, गेल्या काही महिन्यांत अनेक अभिनेत्रींच्या मृत्यूच्या घटना समोर आल्यानंतर यासंदर्भात नवीन वाद सुरू झाला आहे. कमी वयामध्ये अभिनेत्रींचा संशयास्पद मृत्यू का होत आहे? यावरून आता सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली आहे. गेल्या तीन महिन्यांमध्ये अभिनेत्रीच्या मृत्यूची ही तिसरी घटना आहे. अशामध्ये आता सोफियाच्या मृत्यूमुळे सर्वांना धक्का बसला आहे. सोफियासोबत नेमकं काय झालं याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.