Famous Actor  Saam tv
मनोरंजन बातम्या

Famous Actress Death : हरहुन्नरी अभिनेता काळाच्या पडद्याआड; झोपेतच झाला मृत्यू, सिनेसृष्टीवर शोककळा

Famous Actor Death News : हॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेता काळाच्या पडद्याआड गेला आहे. या अभिनेत्याच्या मृत्यूने सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

Vishal Gangurde

हॉलीवूडचे दिग्गज अभिनेता‑दिग्दर्शक रॉबर्ट रेडफोर्ड यांचे वय ८९ वर्षी निधन

ते सनडान्स फिल्म फेस्टिव्हलचे संस्थापक होते.

त्यांनी स्वतंत्र सिनेमा सशक्त करण्यासाठी खूप काम केलं.

हॉलिवूडमधून दु:खद बातमी हाती आली आहे. हॉलिवूड सिनेसृष्टीतील प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते, ऑस्कर विजेते दिग्दर्शक रॉबर्ट रेडफोर्ड यांचं वयाच्या ८९ व्या वर्षी निधन झालं. रॉबर्ट यांचं सनडान्स येथील राहत्या घरी निधन झाल्याचं सिंडी बर्गर यांनी सांगितलं. द न्यूयॉर्क टाइम्सने याबाबत माहिती दिली आहे.

हॉलिवूडच्या स्क्रीन आयकॉन आणि 'सिनेमॅटिक फ्रिडम' या विषयासाठी रॉबर्ट यांनी नेहमी प्रोत्साहन दिलं. ते सनजान्स फिल्म फेस्टिवलचे संस्थापक होते. अमेरिकेच्या युटामध्ये रॉबर्ट यांचं निधन झालं.

द न्यूयॉर्क टाइम्सच्या रिपोर्टनुसार, रेडफोर्ड यांनी युटाच्या सनडान्स येथील राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. ते राहत्या घरी त्यांच्या कुटुंबासोबत राहत होते. रेडफोर्ड यांचं झोपेतच मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.

१९६० च्या दशकात रॉबर्ट रेडफोर्ड यांनी हॉलिवूडमध्ये स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. त्यांनी दमदार अभिनयाच्या जोरावर स्वत:चा मोठा चाहता वर्ग निर्माण केला. रॉबर्ट हे 'बूच कॅसिडी अँड द सनडान्स किड' आणि ऑल द प्रेसीडेंट्स मेन' या सारख्या सिनेमामुळे यशाच्या शिखरावर नेलं. 1970 च्या दशकात त्यांचं नाव हॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्यांच्या यादीत समाविष्ट झालं.

अभिनयाबरोबर त्यांनी दिग्ददर्शनाच्या क्षेत्रातही कमाल केली. त्यांच्या 'ऑर्डिनरी पीपल' या सिनेमाने ऑस्कर जिंकला. या व्यतिरिक्त 'ए रिवर रन थ्रू इट' सारख्या सिनेमामुळे त्यांनी लोकांमध्ये वेगळी ओळख निर्माण झाली. आगळ्यावेगळ्या धाटणीच्या सिनेमांचं दिग्दर्शन केल्याने त्यांनी त्यांच्या सिनेमाचा मोठा चाहता वर्ग निर्माण केला.

रॉबर्ट यांनी १९८१ साली सनडान्स इन्स्टिट्यूटची स्थापना केली. हीच संस्था पुढे जाऊन सनडान्स फिल्म फेस्टिवलचा मोठा आधार ठरला. रेडफोर्ड यांना इंडी सिनेमाचं गॉडफादरही म्हटलं जातं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : माघी गणेश जयंती निमित्ताने दगडूशेठ दर्शनासाठी गर्दी...

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर किती असणार? पगार कितीने वाढणार? वाचा

Jalna : तलाठ्याला जालन्यात बेदम मारहाण, अवैध गौण खनिज उत्खननाविरोधात कारवाईवेळी राडा

Mumbai Horror: मुंबईत माणुसकीचा कळस गाठणारी क्रूरता, अडीच महिन्याच्या कुत्र्यावर लैंगिक अत्याचार

Weight Loss Tips: जीम किंवा डाएट न करताही अडीच महिन्यात कमी करू शकता 10 किलो वजन; डॉक्टरांनी सांगितले ३ सोपे उपाय

SCROLL FOR NEXT