Tyler Christopher Passed Away Instagram
मनोरंजन बातम्या

Tyler Christopher Dies: हॉलिवूडवर कोसळला दु:खाचा डोंगर, ‘जनरल हॉस्पिटल’ फेम अभिनेत्याचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

Tyler Christopher Passed Away: हॉलिवूड अभिनेता टायलर ख्रिस्तोफर याचे वयाच्या ५० व्या वर्षी निधन झाले आहे.

Chetan Bodke

Tyler Christopher Dies

हॉलिवुड सिनेसृष्टीतून एक दुःखद बातमी समोर आली आहे. ‘जनरल हॉस्पिटल’ आणि ‘डेज ऑफ अवर लाइव्ह फ्रॉम’ या फेमस टेलिव्हिजन शोमधून प्रकाशझोतात आलेला अभिनेता टायलर ख्रिस्तोफर याचे वयाच्या ५० व्या वर्षी निधन झाले आहे. अभिनेत्याचे निधन हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने झाले आहे. दरम्यान, जनरल हॉस्पिटल फेम मॉरिस बेनार्ड यांनी टायलरच्या मृत्यूची पुष्टी केली. (Actor)

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मॉरिसने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सांगितले की, "टायलर क्रिस्टोफरच्या निधनाचे वृत्त सांगताना अत्यंत दुःख होत आहे. टायलरचे आज सकाळी त्याच्या सॅन डिएगो अपार्टमेंटमध्ये हृदयविकाराच्या तिव्र झटक्याने निधन झाले. टायलर खरोखरच प्रतिभावान व्यक्ती होता. त्याने आपल्या अभिनयातून सर्वांचेच निखळ मनोरंजन केले होते. त्याने रुपेरी पडदा गाजवला होता. टायलरच्या पश्चात असणाऱ्यांना त्याचा स्वभाव माहित होता. गेल्या काही दिवसांपासून तो नैराश्यात राहत होता. टायलर माझा जवळचा व्यक्ती होता. त्याच्या निधनामुळे मला खूपच वाईट वाटतेय. " (Hollywood)

टायलर यांच्या निधनाचे वृत्त ऐकून चाहत्यांना फार मोठा धक्का बसला आहे. अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून पोस्ट करत त्याला श्रद्धांजली वाहिली आहे. दरम्यान, अभिनेत्याबद्दल सांगायचे तर, टायलर ख्रिस्तोफरने ‘जनरल हॉस्पिटल’च्या माध्यमातून प्रेक्षकांचे १९६९ ते २०१६ पर्यंत निखळ मनोरंजन केले. त्या सोबतच ‘डेज ऑफ अवर लाइव्ह’ या मालिकेमध्ये डिमेराचे पात्र साकारले आहे. (Entertainment News)

त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगायचे तर, ईवा लोंगारियासोबत टायलरने २००२ मध्ये लग्नगाठ बांधली होती. त्यांच्यातील नाते फार काळ टिकले नाही. नंतर वैनेसा मार्सिल आणि नतालिया लिविंगस्टनला डेट केले. (Serial)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thackeray: काही तासांत ठाकरेंची तोफ धडाडणार; युतीची घोषणा होणार? आधी अन् शेवटी कोण भाषण करणार? A टू Z माहिती..

Marathi bhasha Vijay Live Updates : ठाकरेंच्या मेळाव्यासाठी मनसेने छापले खास टीशर्ट, पाहा व्हिडिओ

Salman Khan : रक्तबंबाळ शरीर अन् डोळ्यात आग; सलमानच्या 'बॅटल ऑफ गलवान'चं पोस्टर रिलीज, पाहा VIDEO

Tax Free Income: कामाची बातमी! या १० ठिकाणाहून येणाऱ्या पैशांवर एक रुपयाही टॅक्स नाही; ITR भरण्यापूर्वी या गोष्टी वाचाच

Worli Tourism: वरळीपासून अगदी जवळची आणि खास ठिकाणं, One Day Trip साठी ठरेल बेस्ट

SCROLL FOR NEXT