Actor Martin Short daughter Katherine Short end her life SaaM Tv
मनोरंजन बातम्या

Death News: प्रसिद्ध अभिनेत्याच्या मुलीचं निधन; ४२ व्या वर्षी स्वतःवर गोळी झाडून संपवलं आयुष्य

Death News: प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेता मार्टिन शॉर्ट यांची मुलगी कॅथरीन शॉर्ट हिने लॉस एंजेलिसमध्ये स्वतःवर गोळी झाडून आयुष्य संपवलं आहे. या बातमीने हॉलिवूडला धक्का बसला आहे.

Shruti Vilas Kadam

Death News: हॉलिवूड इंडस्ट्रीमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्याच्या मुलीने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली आहे. या बातमीने चित्रपटसृष्टीत तसेच अभिनेत्याच्या चाहत्यांना सर्वांना धक्का बसला आहे.

प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेता मार्टिन शॉर्ट यांची ४२ वर्षीय मुलगी कॅथरीन शॉर्ट हिने आत्महत्या केली आहे. ती लॉस एंजेलिसमधील तिच्या घरात मृतावस्थेत आढळली. कॅथरीनने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याचे वृत्त आहे. TMZ या इंग्रजी वेबसाइटनुसार, कॅथरीन शॉर्टने सोमवारी रात्री हॉलिवूड हिल्समधील तिच्या घरी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली.

वडील मार्टिन शॉर्ट यांची पोस्ट

अभिनेता मार्टिन शॉर्ट यांच्या मुलीच्या अचानक मृत्यूनंतर, तिचे वडील आणि अभिनेता मार्टिन शॉर्ट यांनी एक निवेदन प्रसिद्ध केलं आहे. त्यांनी म्हटले आहे की, "कॅथरीन हार्टली शॉर्टच्या निधनाची आम्ही अत्यंत दुःखद अंतकरणाने माहिती देत आहोत. या नुकसानाने शॉर्ट कुटुंबाला धक्का बसला आहे आणि आम्ही विनंती करतो की तुम्ही सर्वांनी कृपया या कठीण काळात आम्हाला एकटं सोडावे. कॅथरीन सर्वांची लाडकी आणि खूप प्रेमळ होती आणि तिच्या जाण्याने आमच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

कॅथरीनचे वडील एक प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेता आहेत. पण, कॅथरीन एक प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ता म्हणून काम करत होती. ती "अमी हेल्थ" नावाचे स्वतःचे क्लिनिक चालवत होती. कॅथरीनला मानसशास्त्राची चांगली समज होती आणि ती मानसिक रुग्णांची काळजी घेत असे. त्यामुळे, तिच्या आत्महत्येच्या बातमीने सर्वांना धक्का बसला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

इराणचा नवा 14 कलमी शांतता प्रस्ताव; युद्धविराम प्रस्तावावर चर्चा होणार की तणाव वाढणार?

नसरापूर घटनेचा SIT करणार तपास; नराधमाला फाशी द्या, नागरिकांची मागणी

Nagpur Heatstroke: महाराष्ट्रात उष्णतेची जीवघेणी लाट, नागपूरमध्ये उष्माघातामुळे 3 जणांचा मृत्यू?

Maharashtra News Live Update: राजूर घाटात भीषण वनवा; अजिंठा पर्वतरांगेतील जंगलाला आग

8th Pay Commission: ५० लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात होणार वाढ, नवीन वेतनश्रेणी कधी लागू होणार? मोठी अपडेट समोर

SCROLL FOR NEXT