Ankita Lokhande Completed 15 Years In The Film Industry Saam Tv
मनोरंजन बातम्या

Ankita Lokhande Post : अंकिता लोखंडेला फिल्मइंडस्ट्रीमध्ये झाले १५ वर्षे पूर्ण, अभिनेत्रीची भावुक पोस्ट व्हायरल

Ankita Lokhande Completed 15 Years In The Film Industry : हिंदी टिव्ही इंडस्ट्रीमध्ये अंकिता लोखंडे प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांमध्ये विशेष स्थान प्रस्थापित केले आहे.

Chetan Bodke

हिंदी टिव्ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून अंकिता लोखंडे प्रसिद्ध आहे. तिने आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांमध्ये विशेष स्थान प्रस्थापित केले आहे. 'पवित्रा रिश्ता' मालिकेतून अंकिता लोखंडेला मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी मिळाली आहे. या मालिकेच्या माध्यमातूनच तिने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. या मालिकेमध्ये, अंकिताने अर्चना हे पात्र साकारले आहे. आज अंकिताला फिल्म इंडस्ट्रीमध्ये पदार्पण करून १५ वर्षे झालेले आहेत. फिल्म इंडस्ट्रीमध्ये १५ वर्षे झाल्यानंतर अभिनेत्रीने एक इन्स्टा पोस्ट शेअर केलेली आहे.

या पोस्टमध्ये तिने आपल्या फिल्म इंडस्ट्रीतल्या प्रवासाबद्दल भाष्य केले आहे. "१५ वर्षांपूर्वी 'पवित्र रिश्ता'मध्ये अर्चना म्हणून माझा फिल्मी प्रवास सुरू झाला. आज १५ वर्षांनंतरही मला त्याच नावाने ओळखलं जाईल, ही गोष्ट मला माहित नव्हती. अर्चना माझ्यात होती आणि तिने मला आयुष्यभर खूप काही शिकवले आहे. अर्चना आणि पवित्र्य रिश्ता या माझ्या स्ट्रगलच्या दिवसांत मला मिळालेले प्रेम मला कायमच जिवंत ठेवते. यापेक्षा अधिक मौल्यवान दुसरे काही असेल, असं मला वाटत नाही. जेव्हा मी 'पवित्र रिश्ता'मध्ये काम करायला सुरुवात केली तेव्हा मला अभिनय कसा करावा हे माहित नव्हते. या शो ने मला खूप काही शिकवलं आहे. मला प्रेक्षकांनी दिलेल्या प्रचंड प्रेमाचे मी आभार मानू इच्छिते. " असं अंकिता आपल्या पोस्टमध्ये म्हणाली.

अंकिताला 'पवित्र रिश्ता'मालिकेमुळे अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. अंकिताने नुकताच 'स्वातंत्र्यवीर सावरकर' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केलेले आहे. अंकिता लोखंडे आणि तिचा पती विकी जैन दोघेही 'बिग बॉस १७' मध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाले होते. अंकिता टॉप ५ मध्ये सहभागी झाली होती. पण तिच्या हातातून थोडक्यात 'बिग बॉस १७'ची ट्रॉफी निसटली. अंकिताला टॉप ४ मध्ये समाधान मानून घ्यावे लागले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ambarnath: अंबरनाथमध्ये काँग्रेसला भगदाड, काँग्रेसच्या त्या १२ नगरसेवकांचा मोठा निर्णय

मुस्लीम चिडला, जलीलांवर हल्ला; छत्रपती संभाजीनगरमध्ये नेमका राडा कशामुळे झाला?

Why crocodiles cry: शिकार खात असताना मगर का रडते? उत्तर ऐकून तुम्हीही व्हाल चकित

Maharashtra Live News Update: भिवंडीत कोणार्क विकास आघाडीच्या महिला सभेत भाजपा आमदाराचा राडा

आहो सुदामे! रीलस्टार अथर्व सुदामेला PMP कडून तिसरी नोटीस, 50 हजारांचा दंड

SCROLL FOR NEXT