Katy Perry Video : अनंत- राधिकाच्या दुसऱ्या प्री-वेडिंगमध्ये अमेरिकन सिंगरच्या गाण्यावर उपस्थितांनी धरला ठेका, Video Viral

Anant Ambani- Radhika Merchant 2nd Pre Wedding : प्री- वेडिंगच्या तिसऱ्या दिवशी जगप्रसिद्ध अमेरिकन सिंगर कॅटी पेरीने परफॉर्मन्स केला. यावेळी तिने आपल्या खास अंदाजात उपस्थितांना तिने मंत्रमुग्ध केले.
Katy Perry Video : अनंत- राधिकाच्या दुसऱ्या प्री-वेडिंगमध्ये अमेरिकन सिंगरच्या गाण्यावर उपस्थितांनी धरला ठेका, Video Viral
Anant Ambani- Radhika Merchant 2nd Pre Wedding Perform In Katy PerrySaam Tv

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचं दुसरं प्री-वेडिंग क्रूझवर अगदी थाटामाटात पार पडत आहे. या प्री- वेडिंगला जगभरातल्या सेलिब्रिटींनी उपस्थिती लावलेली आहे. हा प्री- वेडिंग सोहळा क्रूझवर पार पडत असून इटली ते फ्रान्स ती क्रूझ असा प्रवास करत आहे. या इव्हेंटला अनेक हॉलिवूड सिंगर परफॉर्मन्स करणार आहेत. प्री- वेडिंगच्या तिसऱ्या दिवशी जगप्रसिद्ध अमेरिकन सिंगर कॅटी पेरीने परफॉर्मन्स केला. यावेळी तिने आपल्या खास अंदाजात उपस्थितांना तिने मंत्रमुग्ध केले.

Katy Perry Video : अनंत- राधिकाच्या दुसऱ्या प्री-वेडिंगमध्ये अमेरिकन सिंगरच्या गाण्यावर उपस्थितांनी धरला ठेका, Video Viral
Shubman Gill Wedding : शुभमन गिल १० वर्षे मोठ्या अभिनेत्रीसोबत लग्न करणार? ‘बहू हमारी रजनीकांत’ फेम अभिनेत्रीने केला खुलासा

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या दुसऱ्या प्री- वेडिंगमध्ये तिसऱ्या दिवशी कॅटी पेरीने परफॉर्मन्स केला होता. यादरम्यानचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. तिने आपल्या खास पॉप गाण्यांनी सर्वांचे निखळ मनोरंजन केले. यावेळी कॅटीने खास स्टायलिश अंदाजामध्ये सिल्वर वेस्टर्न आऊटफिट वेअर केलेला होता. यावेळी तिची म्युझिक टीमही तिच्यासोबत उपस्थित होती. कॅटी पेरीने या कार्यक्रमासाठी तब्बल ४५ कोटी रुपये मानधन स्विकारले आहे.

इटलीपासून सुरू झालेली ही पार्टी आज १ जूनला फ्रान्समधील कान्स संपणार आहे. या प्री- वेडिंग सोहळ्यासाठी तब्बल ८०० पाहुणे उपस्थित राहिले होते. अवघ्या काही तासांच्या ह्या कार्यक्रमामध्ये, तिने काही मिनिटांसाठीच परफॉर्म सादर केला होता. प्री- वेडिंगच्या पहिल्या दिवशी लोकप्रिय अमेरिकन बँड आणि बॅकस्ट्रीट बॉइजने कूझवर परफॉर्म केला. त्यांच्या परफॉर्मन्सचाही व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अनंत-राधिकाच्या दुसऱ्या प्री-वेडिंग फंक्शनसाठी सलमान खान, आलिया भट्ट, रणवीर सिंग, रणबीर कपूर, सारा अली खान यांच्यासह अनेक बॉलिवूड स्टार्स इटलीला पोहोचले आहेत.

Katy Perry Video : अनंत- राधिकाच्या दुसऱ्या प्री-वेडिंगमध्ये अमेरिकन सिंगरच्या गाण्यावर उपस्थितांनी धरला ठेका, Video Viral
Kangana Ranaut Vote In Mandi Lok Sabha : नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, कंगना रणौतला विश्वास, मतदानानंतर काय म्हणाली अभिनेत्री?

येत्या जुलै महिन्यामध्ये अनंत- राधिका यांचा लग्न सोहळा पार पडणार आहे. जो तीन दिवसांचा असून यावेळीही प्रत्येक दिवशी वेगवेगळी ड्रेस थीम ठेवण्यात आलेली आहे. १२ जुलै रोजी अनंत- राधिका यांचा लग्नसोहळा पार पडणार आहे, त्यादिवशी उपस्थितांना भारतीय पारंपारिक कपडे परिधान करावे लागणार आहेत. १३ जुलै रोजी वधू- वरांना आशिर्वाद देण्याचा कार्यक्रम पार पडणार आहे, त्यादिवशी इंडियन फॉर्मल ड्रेस उपस्थितांना वेअर करावा लागणार आहे. तर १४ जुलै रोजी रिसेप्शन असेल, त्यादिवशी इंडियन चीक ड्रेस वेअर करावा लागणार आहे. हा लग्नाचा कार्यक्रम जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये पार पडणार आहे.

Katy Perry Video : अनंत- राधिकाच्या दुसऱ्या प्री-वेडिंगमध्ये अमेरिकन सिंगरच्या गाण्यावर उपस्थितांनी धरला ठेका, Video Viral
Malaika- Arjun Breakup Rumors : मलायका-अर्जुन कपूरचा खरंच ब्रेकअप झालाय का? अभिनेत्रीच्या मॅनेजरने केला मोठा खुलासा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com