Sridevi Death Anniversary Updates Saam Tv
मनोरंजन बातम्या

Sridevi Death Anniversary: ​​बॉलिवूडच्या 'चांदनी'बद्दल या 5 गोष्टी तुम्हाला माहिती नसतील!

24 फेब्रुवारी 2018 रोजी श्रीदेवी यांचे निधन झाले.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई - आज श्रीदेवी (Shridevi) यांची चौथी पुण्यतिथी आहे. 24 फेब्रुवारी 2018 रोजी श्रीदेवी यांचे निधन झाले. श्रीदेवी आज भलेही आपल्यासोबत नसल्या तरी त्यांनी आपल्या मागे अशा अनेक आठवणी सोडल्या आहेत ज्या कायम आपल्या हृदयात जिवंत राहतील.

श्रीदेवी हिंदी चित्रपटसृष्टीतील अश्या अभिनेत्री (Actress) होत्या, जिच्यासोबत प्रत्येक बॉलिवूड कलाकार काम करू इच्छित होते. श्रीदेवी यांच्या चित्रपटांच्या यशामुळे श्रीदेवीला लेडी अमिताभ असे म्हटले जात होते. आज त्यांच्या चौथ्या पुण्यतिथीनिमित्त आम्ही तुम्हाला अशा 5 गोष्टी सांगणार आहोत, ज्या तुम्हाला कदाचित माहीत नसतील…

हे देखील पहा -

1. या गोष्टीचा राग यायचा

श्रीदेवी यांनी एका मुलाखतीदरम्यान हे सांगितले होते की, जेव्हा बोनी कपूर त्यांना त्यांच्या वयाची आठवण करून द्यायचे तेव्हा त्यांना खूप राग येत होता. श्रीदेवी यांनी मिश्किल अंदाजात सांगितले की, जेव्हा लोक त्यांना त्यांनी 50 वर्षे काम केले आहे आणि त्या इतरांपेक्षा मोठ्या आहेत हे जाणीव करून देत होते तेव्हा त्या नाराज व्हायच्या.

2. लुक आणि मेकअपची विशेष काळजी

श्रीदेवी नेहमी त्यांच्या लुक आणि मेकअपची विशेष काळजी घेत असे. त्या एखाद्या कार्यक्रमाला जायच्या तर त्यांना तयार व्हायला तासनतास लागायचे.

3. साडी आवडायची...

पहिली महिला सुपरस्टार असण्यासोबतच श्रीदेवी बॉलिवूडची स्टाइल दिवा होत्या . त्यांना साडी हा पेहरावा खूप आवडायचा. त्या जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात गेल्या तरी त्या स्वत:साठी उत्तमोत्तम साडी खरेदी करायच्या. त्याचबरोबर प्रत्येक महत्त्वाच्या कार्यक्रमात त्या साडीमध्ये दिसून येत होत्या.

4. स्वतः स्वयंपाकघर सांभाळायची

श्रीदेवी जितकी यशस्वी अभिनेत्री होती तितकीच ती एक प्रेमळ आई आणि पत्नी होती. फक्त कामासाठीच त्या घराबाहेर पडत होत्या. त्या स्वतः किचन सांभाळायच्या आणि किचनमधील सगळी कामं स्वतः करत होत्या. जेवणापासून ते स्वच्छतेपर्यंत सर्व गोष्टींची श्रीदेवी स्वतः काळजी घेत होत्या.

5. मुलींची विशेष काळजी घ्यायची

स्वत: जान्हवी कपूरने सांगितले आहे की, आई श्रीदेवी तिच्याकडून प्रत्येक क्षणाचे अपडेट्स कशी घेत असे. जान्हवीसोबत श्रीदेवी देखील 'धडक' च्या सेटवर उपस्थित होत्या. दिवसातून एकदा शांतपणे बसून त्या आपल्या दोन्ही मुलींशी गप्पा मारायच्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: महामंडळावर निवडणुकीनंतरच नियुक्ती, इच्छुकांच्या पदरी पुन्हा निराशा

Pandharpur News: चंद्रभागेच्या पाण्याची तीर्थ म्हणून विक्री; सुरक्षा कर्मचाऱ्यांचा गोरखधंदा उघड

Maharashtra Politics :...तर सोलापुरातून तिरुपतीसाठीही विमान सेवा सुरू होणार; जयकुमार गोरेंचा प्रणिती शिंदेंना टोला

Heart Health: व्यायाम करताना 'या' चुका टाळा, अन्यथा हृदयावर होतील होतील गंभीर परिणाम

Ladki Bahin Yojana: 'लाडकी'चा 4800 कोटींचा घोटाळा, कष्टकऱ्यांचे पैसे कुणाच्या खिश्यात?

SCROLL FOR NEXT