मराठी अभिनेत्री हेमांगी कवी नेहमीच आपल्या अभिनयामुळे चर्चेत असते. हेमांगी अभिनयासोबतच तिच्या स्पष्टवक्तेपणामुळे चर्चेत असते. हेमांगी कवी नेहमी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत असते. हेमांगीने अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. याच मालिकांमधील शीर्षकगीत आता दाखवत नाही, याबाबत तिने खंत व्यक्त केली आहे. हेमांगीने सोशल मीडियावर पोस्ट करत शीर्षकगीत न दाखवण्यामागचे कारण सांगितले आहे.
हेमांगीने' एक झोका नियतीचा' या मालिकेच्या शीर्षक गीताचा व्हिडिओ शेअर करत पोस्ट केली आहे. 'जेव्हा मालिकांना शीर्षकगीतं असायची, ती वेगळी चित्रीत केली जायची आणि मालिकेच्या सुरवातीला ४०-६० सेकंदासाठी दाखवली ही जायची! आपण प्रेक्षक आवडीने ते पाहयचो, ऐकायचो. अशा किती मालिका आहेत ज्याची शीर्षकगीतं आज ही २०-२२ वर्ष झाली तरी आठवतात, आवडतात! आता इतक्या वाहिन्यांवरील मालिकांच्या चढाओढीमुळे सरळ episode सुरू करतात. एक एक सेकंदही महत्त्वाचा असतो. त्यात त्यांचा ही दोष नाही, प्रेक्षक आपली मालिका सोडून इतर कुठे ही जाऊ नये म्हणजे इतर कुठल्याही वाहिनीकडे वळू नये म्हणून जे शक्य आहे ते करतात. त्यात या शीर्षकगीतांचा बळी गेला. असो', असं हेमांगीने कॅप्शनमध्ये लिहलं आहे.
'मी मराठी वाहिनीच्या ‘एक झोका नियतीचा’ मालिकेचं हे शीर्षकगीत. बाकी माहीती या video त आहेच. वर्ष २००९! फक्त मराठी च्या YouTube channel वर ही मालिका पाहण्यासाठी उपलब्ध आहे! पण तुम्हाला खरंच वाटतं का की पुन्हा अशी शीर्षकगीतं मालिकेच्या सुरवातीला दाखवायला हवीत आणि तुमचं आवडतं शीर्षकगीत कोणतं?, असं हेमांगीने या पोस्टवर कॅप्शन दिले आहे'असंही तिने लिहलं आहे.
हेमांगीच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. या पोस्टवर गायिका सावनी रविंद्रने कमेंट केली आहे की, हो अर्थात!!! शीर्षकगीत हे मालिकेचा चेहरा आहे! चेहरा दिसायलाच हवा ना आधी. तसेच नेटकऱ्यांनी आम्ही मालिकेचे शीर्षकगीत खूप मिस करतो, अशा कमेंट्स केल्या आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.