Indrayani Serial: इंदूच्या भेटीसाठी महाराष्ट्र आतूर…, 'इंद्रायणी'चे शीर्षकगीत रिलीज

Indrayani Serial Title Song Released: या मालिकेचा प्रोमो काही दिवसांपूर्वी रिलीज करण्यात आला होता त्यामध्ये इंद्रायणीची भूमिका साकरणाऱ्या छोट्या इंदूची झलक सर्वांना पाहायला मिळाली. आता या मालिकेचे शीर्षकगीत रिलीज झाले.
Indrayani Serial
Indrayani Serial Saam Tv
Published On

Anita Date And Sandip Pathak Indrayani Serial:

कलर्स मराठी वाहिनीवर लवकरच एक नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गेल्या काही दिवसांपासून या मालिकेचीच सगळीकडे चर्चा सुरू आहे. इंद्रायणी असं या मालिकेचे नाव असून ही मालिका येत्या २५ मार्चपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेचा प्रोमो काही दिवसांपूर्वी रिलीज करण्यात आला होता त्यामध्ये इंद्रायणीची भूमिका साकरणाऱ्या छोट्या इंदूची झलक सर्वांना पाहायला मिळाली. अशामध्ये आता या मालिकेचे शीर्षकगीत रिलीज करण्यात आले आहे. या शीर्षकगीताला प्रेक्षकांकडून चांगली पसंती मिळत आहे.

अवघ्या महाराष्ट्राला सध्या जे कोडं पडलंय की, कोण आहे इंदू? तर इंदू म्हणजेच 'इंद्रायणी' इंद्रायणी म्हणजे अख्ख्या गावाची लाडकी इंदू. एक निरागस, निष्पाप, गोड, सालस, अवखळ आणि तितकीच विचारी मुलगी. वय लहान परंतु बुद्धी मात्र मोठ्यांनाही अचंबित करणारी. इंदूच्या निरागस तरी मार्मिक प्रश्नांनी भल्याभल्यांना प्रोमोतच निरूत्तर केलंय आणि तितकंच तिचं अस्सल आणि अवखळ बालपण अनेकांना आपल्या बालपणाची आठवणही करून देतंय. म्हणून या इंदूच्या भेटीसाठी रसिकांना उत्कंठा लागून राहिलीय.

इंद्रायणी मालिकेचं एक गोड शीर्षकगीत रसिकांच्या भेटीला आलंय. इंदू इतकंच तेही प्रेक्षकांना प्रचंड आवडतंय. 'गीत तुझं डोलण्याचं, वाऱ्यासंगं हालण्याचं..पाखरांशी बोलण्याचं, चांदण्यात चालण्याचं!', असे या शीर्षकगीताचे बोल आहेत. इंदूचं भावविश्व मांडणारं हे अर्थपूर्ण शीर्षकगीत लिहिण्यात आले आहे. प्रसिद्ध गीतकार आणि कवी दासू वैद्य यांनी हे गाणं लिहिलं असून ए व्ही प्रफुल्लचंद्र यांनी ते संगीतबद्ध केलंय. तर राष्ट्रीय पुरस्कार विजेती गायिका सावनी रवींद्रने हे गाणं गायलं आहे.

'इंद्रायणी' मालिकेच्या प्रत्येक प्रोमोने रसिकांची उत्कंठा शिगेला पोहोचवली आहे. कारण यात इंदूची भूमिका करणारी बालकलाकार साताऱ्याची सांची भोईर सध्या लक्षवेधी ठरतेय. तसंच गुणी अभिनेत्री अनिता दाते आणि संदीप पाठक या मालिकेत आपल्या दमदार अभिनयाने रसिकांना पुन्हा एकदा सुखद धक्का देतील. या दोन तगड्या कलाकारांबरोबर 'जय जय स्वामी समर्थ' मालिकेमध्ये चोळप्पाच्या भूमिकेद्वारे रसिकांची मनं जिंकणारा स्वानंद बर्वे हा कलाकारही या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे.

Indrayani Serial
Kangana Ranaut: इमानदारीने पैसा कमवा..., अंबानींच्या पार्टीमध्ये डान्स करणाऱ्या बॉलिवूड सेलिब्रिटींवर कंगना रनौत संतापली

इंद्रायणी या मालिकेचं लेखन प्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक अभिनेता चिन्मय मांडलेकर करत आहेत. तर या मालिकेचे दिग्दर्शक विनोद लव्हेकर आहेत. ‘जीव झाला येडापिसा’ , ‘राजारानीची गं जोडी’ आणि ‘पिरतीचा वनवा उरी पेटला’ या कलर्स मराठीवरील लोकप्रिय मालिकांची निर्मिती करणाऱ्या पोतडी एंटरटेनमेंट या मालिकेची निर्मिती करत आहे. या मालिकांचे दिग्दर्शक विनोद लव्हेकर हे आहेत. २५ मार्चपासून संध्याकाळी ७ वाजता कलर्स मराठीवर ही मालिका प्रसारित होणार आहे.

Indrayani Serial
Sunny Leone: बॉलिवूडच्या सनी लियोनीला मराठमोळ्या गाण्याची भुरळ, 'कन्नी'तल्या 'नवरोबा'वर केला अफलातून डान्स

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com