Hema Malini  SAAM TV
मनोरंजन बातम्या

Hema Malini : हेमा मालिनी यांनी अंधेरीतील २ आलिशान फ्लॅट्स विकले; किती कोटींमध्ये झाली डील, नफा वाचून थक्क व्हाल

Hema Malini Sold Luxurious Flats : बॉलिवूड अभिनेत्री हेमा मालिनी यांनी दोन आलिशान फ्लॅट्स विकले आहे. त्यांना कोट्यवधींचा नफा झाला आहे.

Shreya Maskar

हेमा मालिनी यांनी दोन आलिशान फ्लॅट्स विकले आहेत.

दुसरीकडे हेमा मालिनी यांनी एक लग्जरी कार खरेदी केली आहे.

कोट्यवधींमध्ये घराची डील झाली आहे.

बॉलिवूड ज्येष्ठ अभिनेत्री हेमा मालिनी (hema malini) यांच्या अभिनयाचे आणि सौंदर्याचे लाखो चाहते दिवाने आहेत. त्या एक लग्जरी आयुष्य जगत आहे. हेमा मालिनी या कोट्यावधींच्या मालकीण आहेत. आता हेमा मालिनी या वेगळ्या कारणामुळे चर्चेत आल्या आहेत. त्यांनी दोन आलिशान अपार्टमेंट विकले आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, हेमा मालिनी यांनी अंधेरी पश्चिमेतील ओशिवराच्या पॉश ओबेरॉय स्प्रिंग्स सोसायटीमधील त्यांचे दोन आलिशान अपार्टमेंट विकल्या आहेत.

किती कोटींचा व्यवहार?

मीडिया रिपोर्टनुसार, हेमा मालिनी यांनी ऑगस्ट महिन्यात घरांचे व्यवहार केले आहेत. त्यांनी दोन अपार्टमेंट तब्बल 12.50 कोटी रुपयांना विकले आहेत. दोन्ही घरे प्रत्येकी 6.25 कोटी रुपयांना विकली. 31.25 लाख रुपयांची स्टॅम्प ड्युटी आणि 30,000 रुपयांचे नोंदणी शुल्क भरण्यात आले. अपार्टमेंटचा कार्पेट एरिया 847 चौरस फूट आणि बिल्ट-अप एरिया 1,017 चौरस फूट आहे. येथे कार पार्किंगची जागा देखील आहे.

नवीन कारची किंमत?

हेमा मालिनी यांनी घर विकण्यासोबतच गणेशोत्सवादरम्यान एक आलिशान कार देखील खरेदी केली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, हेमा मालिनी यांनी एमजी एम९ (MG M9 luxury car) लग्जरी कार खरेदी केली आहे. ज्याची किंमत तब्बल 75 लाख रुपये आहे. हेमा मालिनी यांच्या कार खरेदीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात हेमा मालिनी या नवीन गाडीची पूजा करताना, चालवताना दिसत आहेत.

हेमा मालिनी यांना बॉलिवूडची 'ड्रीम गर्ल' म्हणून ओळखले जाते. हेमा मालिनी यांनी 90 चे दशक गाजवले आहे. हेमा मालिनी यांनी 100 हून अधिक चित्रपट केले आहेत. हेमा मालिनी यांचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे. चाहते त्यांच्या आगामी प्रोजेक्टची उत्सुकतेने वाट पाहत आहे. नवीन कार घेतल्यामुळे हेमा मालिनी यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: राष्ट्रवादीच्या विधीमंडळ पक्षाची बैठक; गटनेतेपदाच्या निवडीसाठी होणार बैठक

Heart Attack: झोपण्याआधी फक्त १ ग्लास पाणी प्या अन् निरोगी राहा, हार्टअटॅक अन् स्ट्रोकच्या रूग्णांसाठी महत्त्वाची बातमी

Police Corruption News : गुन्हा माफ करतो सांगितलं, ४ लाखांची लाच घेतली; पोलिस अधिकाऱ्याला रंगेहाथ पकडले, VIDEO पाहा

Sunetra Pawar : मोठी बातमी! सुनेत्रा पवार यांचा खासदारकीचा राजीनामा? पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून घेणार शपथ

Hair Fall: केस गळतीवर घरीच करा 'हा' १ सोपा उपाय, १५ दिवसांत दिसेल फरक

SCROLL FOR NEXT