Dhanshri Shintre
ह्युंदाईने भारतीय बाजारपेठेत १० वर्षांचा टप्पा गाठल्याच्या आनंदात लोकप्रिय मिड-साईज एसयूव्ही क्रेटाचे तीन नवे व्हेरिएंट्स सादर केले असून ग्राहकांसाठी पर्याय वाढवले आहेत.
नवीन क्रेटा किंग, क्रेटा नाईट किंग आणि क्रेटा किंग लिमिटेड एडिशन बाजारात दाखल झाले असून, त्यांची किंमत अनुक्रमे १७.८९, १९.५० आणि १९.६४ लाख रुपये ठेवली आहे.
ह्युंदाईने क्रेटा किंग व्हेरिएंटची सुरुवात १७.८९ लाख रुपयांपासून केली असून, हा नवा मॉडेल ग्राहकांसाठी सर्व इंजिन पर्यायांसह बाजारात उपलब्ध करण्यात आला आहे.
टॉप व्हेरिएंट क्रेटा किंगमध्ये १८-इंच डायमंड कट अलॉय व्हील्स, ड्रायव्हर सीट मेमरी फंक्शन आणि पॅसेंजरसाठी इलेक्ट्रिक वॉक-इन डिव्हाइससारखी प्रीमियम वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत.
प्रवासी सीट ८ प्रकारे समायोजित करता येते. तसेच यात डॅशकॅम, ड्युअल-झोन ऑटो क्लायमेट कंट्रोल आणि स्टोरेजसह स्लाइडिंग आर्मरेस्टची सुविधा देण्यात आली आहे.
क्रेटा किंगच्या लिमिटेड एडिशनमध्ये अतिरिक्त फीचर्स दिले आहेत, ज्यात सीट-बेल्ट कव्हर, हेडरेस्ट कुशन, कार्पेट मॅट, की कव्हर आणि डोअर क्लॅडिंगचा समावेश आहे.
एक्सक्लुझिव्ह ‘किंग’ बॅजिंगसह ही एसयूव्ही उपलब्ध असून, यात १.५-लिटर पेट्रोल, १.५-लिटर टर्बो-पेट्रोल आणि १.५-लिटर डिझेल इंजिनचे पर्याय दिले आहेत.
क्रेटा एन लाईनमध्ये टच पॅनलसह ड्युअल-झोन ऑटोमॅटिक टेम्परेचर कंट्रोल, वायरलेस अँड्रॉइड ऑटो व अॅपल कारप्लेची सुविधा तसेच डॅशकॅमचे फीचर्स दिले आहेत.
फीचर अपडेट्ससोबतच, कंपनीने क्रेटा किंगसाठी नवीन ब्लॅक मॅट कलर पर्याय उपलब्ध करून दिला आहे, जो एसयूव्हीला अधिक स्टायलिश आणि दमदार लूक प्रदान करतो.