Dhanshri Shintre
भारतात अनेक अग्रगण्य ऑटोमोबाईल कंपन्या आहेत, ज्या ग्राहकांसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानासह सर्वोत्तम कार पर्याय उपलब्ध करून देतात.
भारतीय बाजारात टाटा मोटर्सने अनेक वर्षांपासून विश्वासार्ह आणि दर्जेदार कार्स उपलब्ध करून ग्राहकांचा विश्वास संपादन केला आहे.
टाटा मोटर्सची टियागो ही कंपनीच्या सर्वाधिक परवडणाऱ्या आणि बजेट-फ्रेंडली कारपैकी एक मानली जाते.
या कारची किंमत ५ लाख रुपयांपासून सुरू होऊन ८.४५ लाख रुपयांपर्यंत जाते, त्यामुळे ती बजेट ग्राहकांसाठी योग्य आहे.
या कारमध्ये पेट्रोलसोबतच CNG चा पर्याय उपलब्ध असून, ग्राहकांना अधिक मायलेज आणि कमी खर्चात प्रवासाचा फायदा मिळतो.
या कारने NCAP क्रॅश टेस्टमध्ये 4-स्टार सेफ्टी रेटिंग मिळवले असून, सुरक्षिततेच्या बाबतीत ती विश्वासार्ह ठरते.
या कारमध्ये 1.2 लिटर (1199cc) क्षमतेचे, 3 सिलेंडर पेट्रोल इंजिन देण्यात आले असून उत्कृष्ट परफॉर्मन्ससाठी डिझाइन केलेले आहे.