
MahaKumbh Hema Malini: भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) खासदार हेमा मालिनी यांनी मंगळवारी माध्यमांसमोर म्हटले की महाकुंभातील चेंगराचेंगरी ही "मोठी घटना" नव्हती आणि ती "अतिशयोक्तीपूर्ण" केली जात होती. खूप चांगल्या प्रकारे व्यवस्थापाना केले गेले असल्याचे त्यांनी सांगितले. २९ जानेवारी रोजी प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभमेळ्यादरम्यान मौनी अमावस्येला चेंगराचेंगरी झाली. उत्तर प्रदेश सरकारने जाहीर केलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार, किमान ३० जणांना आपला जीव गमवावा लागला आणि ६० जण जखमी झाले.
"आम्ही कुंभमेळ्याला गेलो...आम्ही छान आंघोळ केली...सर्व काही व्यवस्थित व्यवस्थापित केले होते," हेमा मालिनी यांनी संसद भवन संकुलात माध्यमांशी संवाद साधताना सांगितले. त्या पुढे म्हणाल्या, हे खरे आहे की घटना घडली... पण, इतके मोठे काहीही घडले नाही. ते किती मोठे होते ते मला माहित नाही. ही घटना खूपच जास्त प्रमाणात ताणली जात आहे... तिथे खूप चांगल्या प्रकारे व्यवस्थापन केले आहे आणि सर्व काही खूप चांगल्याप्रकारे सुरु आहे... बरेच लोक येत आहेत,
चेंगराचेंगरीच्या दिवशी अभिनेत्री ते राजकारणी हेमा मालिनी यांनीही महाकुंभात स्नान केले. चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या लपवल्याचा आरोप विरोधी पक्षाच्या सदस्यांनी सरकारवर केल्याबद्दल विचारले असता, ते म्हणाले, "ते जे काही बोलायचे ते बोलतील... चुकीचे बोलणे हे त्यांचे काम आहे."
मंगळवारी संसदमध्ये महाकुंभातील चेंगराचेंगरीचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी आरोप केला की सरकार चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या लपवत आहे आणि मेळा आयोजित करण्यातील "गैरव्यवस्थापन" लपविण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.