Hema Malini SAAM TV
मनोरंजन बातम्या

Hema Malini : त्यानंतर हेमा मालिनी धर्मेंद्रच्या घरी कधीच गेली नाही, बायकोलाही भेटली नाही; ड्रीम गर्लचा तो किस्सा माहित आहे?

Shreya Maskar

आज (16 ऑक्टोबर ) बॉलिवूडच्या 'ड्रीम गर्ल' चा म्हणजे हेमा मालिनी यांचा 76 वा वाढदिवस आहे. हेमा मालिनी यांनी 90 चे दशक गाजवले आहे. मा मालिनी यांनी 100 हून अधिक चित्रपट केले आहेत. त्यांची मोठी फॅन फॉलोइंग आहे.

बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र (Dharmendra) यांनी पहिल्या पत्नीला घटस्फोट न देता अभिनेत्री हेमा मालिनी (Hema Malini) यांच्याशी दुसरा संसार थाटला. यांच्या लग्नाला जवळपास 44 वर्ष पूर्ण झाली. राम कमल मुखर्जी यांनी लिहिलेल्या 'हेमा मालिनी: बियॉन्ड द ड्रीम गर्ल' या पुस्तकात हेमा मालिनी यांनी खासगी आयुष्यातील काही गोष्टींचा खुलासा केला आहे.

बॉलिवूड अभिनेत्री हेमा मालिनीने सांगितले होते की, "धर्मेंद्र यांच्याशी लग्न केल्यानंतर मी कधीच त्यांच्या पहिल्या पत्नीला भेटली नाही. लग्नाआधी आमची एखादी भेट झाली असेल. मात्र लग्नानंतर आमची पुन्हा कधीच भेट झाली नाही. कारण मला कुणाला त्रास द्यायचा नव्हता. धर्मेंद्र यांनी माझ्यासाठी खूप केलं आहे. तसेच ते माझ्या मुलीसाठीही खूप करतात. यामुळे मी खूप आनंदी आहे. "

हेमा मालिनी पुढे म्हणाल्या की, "धर्मेंद्र यांनी योग्य पद्धतीने वडिलांची भूमिका पार पाडली आहे. मी स्वतः आज स्वतःच्या पायांवर भक्कम उभी आहे. तसेच मी स्वतःची प्रतिष्ठा देखील कायम सक्षम ठेवली आहे. "धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांनी अनेक चित्रपट एकत्र केले आहेत. त्यांच्या अभिनयाचे चाहते दिवाने आहेत.

तसेच अभिनेत्री हेमा मालिनी यांनी धर्मेंद्र यांची पहिली पत्नी प्रकाश कौर बद्दल मोठं वक्तव्य केलं होतं. त्या म्हणाल्या की, "मी प्रकाश कौर यांच्याबद्दल कधीच बोली नाही. त्यांच्यावर कोणतेही वक्तव्य केलं नाही. मात्र मी त्यांचा आदर आणि सन्मान करते. तसेच माझी दोन मुली देखील धर्मेंद्र यांच्या पहिल्या कुटुंबाचा सन्मान करतात. " तसेच ईशा देखील अभिनेता सनी देओल आणि बॉबी देओल या दोघांना राखी बांधते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amravati Breaking : हत्यांच्या घटनांनी अमरावती शहर हादरलं

Benefits of taking Steam: वाफ घेण्याचे फायदे तुम्हाला माहिती आहे का?

Maharashtra News Live Updates : महाविकास आघाडीचं मुंबईतील जागावाटप 90% पूर्ण, तीन जागांचा तिढा उद्यापर्यंत सोडवला जाणार

Maharashtra Assembly Election : निवडणूक जाहीर होताच महायुतीला सर्वात मोठा धक्का! राज्यात जुन्या मित्रपक्षाने सोडली साथ; VIDEO

Maharashtra Politics : विधानसभा निवडणूक जाहीर होताच महायुतीत मिठाचा खडा? अमित शहांच्या वक्तव्यानंतर शिंदे गट आक्रमक, नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT