Singer Police Case Saam Tv
मनोरंजन बातम्या

Singer Police Case: प्रसिद्ध गायक कॉलेज कार्यक्रमात नको ते बरळला; आक्षेपार्ह वक्तव्यामुळे गुन्हा, नेमकं झालं काय?

Singer Police Case: डेहराडूनमध्ये प्रसिद्ध गायकावर आक्षेपार्ह वक्तव्यप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. DAV महाविद्यालयातील कार्यक्रमात नको ते बरळला असून पोलीस संपूर्ण घटनेचा तपास करत आहेत.

Shruti Vilas Kadam

Singer Police Case: डेहराडून येथ हरियाणवी लोकगायक मासूम शर्मा यांच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कॉलेजमधील सांस्कृतिक कार्यक्रमात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप या गायकावर करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, १ एप्रिल रोजी डेहराडूनमधील डीएव्ही (पीजी) महाविद्यालयात एका सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमादरम्यान मासूम शर्माला पाहुणे म्हणून बोलवण्यात आले होते. त्याने कार्यक्रमादरम्यान कथितरित्या आक्षेपार्ह भाषेचा वापर केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे उपस्थित विद्यार्थी तसेच नागरिकांच्या भावना दुखावल्याचे सांगण्यात आले आहे.

या प्रकरणी प्रांचल नौनी यांनी दलनवाला पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे, गायकाच्या वर्तनामुळे कार्यक्रमाचे वातावरण बिघडले आणि समाजात चुकीचा संदेश गेला. यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत संबंधित कलमांनुसार गुन्हा नोंदवला.

पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत कलम २९६ (अश्लील कृत्ये आणि गाणी), कलम ३५२ (शांतता भंग करण्याच्या उद्देशाने केलेला अपमान), कलम ७९ (स्त्रीच्या विनयशीलतेचा अपमान) आणि कलम ३५१(३) (गुन्हेगारी स्वरूपाची धमकी) यांनुसार गुन्हा दाखल केला आहे.

डेहराडून पोलिसांनी एफआयआर दाखल झाल्याची माहिती दिली असून, या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असल्याचे सांगितले आहे. सर्व पुरावे आणि साक्षीदारांच्या आधारे पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. आता या प्रकरणाचा तपास पूर्ण झाल्यानंतरच नेमके सत्य समोर येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बारामतीत गावगुंडांची दहशत; तरुणासह कुटुंबीयांवर जीवघेणा हल्ला, मारहाणीचा व्हिडिओ केला व्हायरल

Sawantwadi Tourism: पावसाला सुरुवात अन् कोकणातील बहरलेलं सौदर्य, विकेंडला सावंतवाडीतील या ७ ठिकाणी करा पिकनिक

Toilet Cleaning Trick: आठवड्यातून एकदा टॉयलेटमध्ये टाका बर्फ, व्हायरल ट्रिकने होईल चमत्कार

महिलांच्या बँक खात्यात येणार दरमहा ३,००० रुपये; भाजप सरकारचा मोठा निर्णय

Maharashtra News Live Update: गडचिरोलीत उष्माघाताचा पहिला बळी

SCROLL FOR NEXT