Babil Khan Post Saam Tv
मनोरंजन बातम्या

Babil Khan: आफ्टर पार्टी आणि दारूपासून दूर...; व्हायरल व्हिडीओनंतर बाबिल खानला 'या' अभिनेत्याचा सल्ला

Babil Khan Post: दिवंगत अभिनेता इरफान खान यांचा मुलगा बाबिल खान एका व्हायरल व्हिडिओनंतर चर्चेत आला आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये बाबिल खान अतिशय वाईट अवस्थेत रडताना दिसत होता.

Shruti Vilas Kadam

Babil Khan Post: दिवंगत अभिनेता इरफान खान यांचा मुलगा बाबिल खान एका व्हायरल व्हिडिओनंतर चर्चेत आला आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये बाबिल खान अतिशय वाईट अवस्थेत रडताना दिसत आहे. बाबिल खानच्या या व्हायरल व्हिडिओनंतर, सेलिब्रिटी सोशल मीडियावर प्रतिक्रिया देत आहेत. सिद्धांत चतुर्वेदी आणि राघव जुयाल यांनी त्यांचा मित्र बाबिल खानसाठी एक पोस्ट लिहिली. त्याचवेळी अभिनेता हर्षवर्धन राणानेही बाबिल खानसाठी पोस्ट केली होती. पोस्टमध्ये त्यांनी बाबिल खानला आफ्टर पार्टी आणि दारूपासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे.

बाबिलला देवाकडून आशीर्वाद...

व्हायरल होत असलेल्या बाबिल खानच्या व्हिडिओमध्ये बाबिल रडत होता. बाबिलच्या त्या व्हिडिओवर नेटकऱ्यांनाही प्रतिक्रिया दिल्या. नेटकरी म्हणाले की बाबिल खान खूप मद्यपी आहे. त्याच वेळी, काही लोकांनी बाबिल खानचे मानसिक आरोग्य चांगले नसल्याचे म्हटले. आता हर्षवर्धनने बाबिलच्या या व्हिडिओवर एक पोस्ट लिहिली आहे. त्याने लिहिले- "प्रिय बाबिल, तुला उत्तम अभिनयाचा देवाकडून आशीर्वाद मिळाला आहे. तू हा अभिनयाचा वारसा उत्तम प्रकारे पुढे घेऊन जा.

बाबिल खानला सल्ला

हर्षवर्धन पुढे लिहतो, तुझ्या कामात तुझे सगळे लक्ष घाल त्यात बेस्ट हो. आफ्टर पार्टी आणि दारूपासून दूर रहा जेणेकरून तू तुला त्रास होणाऱ्या लोकांपासून दूर राहशील. मी फिल्मी कुटुंबातील नाहीये, मी शिकलो आहे की जर तुम्ही त्यांना परवानगी दिली नाही तर लोक तुमच्याशी वाईट वागणार नाहीत. तुम्हाला स्वतःसाठी उभे राहिले पाहिजे.

इरफान खान यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी, बाबिलने पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातील पाण्याच्या समस्येवर काम करणाऱ्या यूट्यूबर प्रेम कुमार यांना ५०,००० ची मदत केली. या प्रसंगी बाबिलने नम्रपणे सांगितले की, "माझं नाव लिहिण्याची गरज नाही, तू चांगलं काम करत आहेस."

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Irshalgad Fort : रायगड फिरायला जाताय, मग इर्शाळगड पाहाच

Pune : पुण्यात उच्चभ्रू परिसरात रेव्ह पार्टी, पोलिसांनी मध्यरात्री धाड टाकली, ३ महिला अन् २ पुरूषांना बेड्या

Nimish Kulkarni : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्याचा थाटात पार पडला साखरपुडा, होणारी बायको कोण?

Remedies On Sunday: रविवारच्या दिवशी मीठाचे उपाय करणं ठरेल फायदेशीर; करियरमध्ये लाभ होऊन नकारात्मकता दूर होईल

Weather Update : राज्यात आजही मुसळधार पावसाची शक्यता, कुठे कोणता अलर्ट? वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT