ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
एलोवेरा जेलमध्ये गुलाब जल मिसळा आणि हे मिश्रण 20 मिनिटांसाठी चेहऱ्यावर लावा. नंतर थंड पाण्याने धुवा.
एलोवेरा जेलमध्ये तांदळाच्या पाण्यात मिक्स करा आणि हे मिश्रण चेहऱ्यावर लावा. 30 मिनिटांनंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा.
एलोवेरा जेलमध्ये मुल्तानी माती मिसळून पेस्ट तयार करा. हे पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि सुकल्यावर पाण्याने धुवा.
एलोवेरा जेलमध्ये बेसन मिसळून पेस्ट तयार करा. हे मिश्रण चेहऱ्यावर लावल्याने त्वचेचा रंग उजळतो.
वरील पैकी कोणताही उपाय आठवड्यातून दोन वेळा वापरू शकता. हे फेस पॅक अंघोळीच्या आधी लावणे अधिक फायदेशीर ठरते.
एलोवेरा जेलचे हे उपाय त्वचेला हायड्रेट ठेवतात, कोरडेपणा कमी करतात आणि त्वचेला नैसर्गिक चमक प्रदान करतात.
या उपायांबरोबरच नियमित स्किन केअर रूटीन, पुरेशी झोप आणि संतुलित आहार घेतल्यास त्वचेला ग्लास स्किनसारखा नैसर्गिक तेज प्राप्त होतो.