kk's last journey begins Saam Tv
मनोरंजन बातम्या

Mumbai : 'केके'ला अखेरचा निरोप देण्यासाठी हरिहरन, सलीम मर्चंट यांसह दिग्गजांची हजेरी

kk's last journey begins : सध्या ज्येष्ठ गायक हरिहरन, सलीम मर्चंट यांसह अनेक दिग्गज केके यांच्या अंतिम दर्शनासाठी त्यांच्या निवासस्थानी पोहोचले आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: प्रसिद्ध गायक कृष्ण कुमार कुन्नथ (KK) यांचे मंगळवारी (३१ जुलै) रात्री कोलकाता (Kolkata) येथे निधन झाले होते. आता त्यांना (Krishnakumar Kunnath) शेवटचा निरोप देण्यासाठी तयारी सुरु करण्यात आली आहे. मुंबईतील (Mumbai) पार्क प्लाझा अपार्टनमेंटमध्ये या त्यांच्या निवासस्थानी लोकं जमण्यास सुरुवात झाली आहे. कोलकात्याहून मुंबईच्या घरी त्यांचं पार्थिव शरीर आणलं जाणार आहे. त्यानंतर सकाळी १०:३० ते दुपारी १२:३० पर्यंत त्यांचं पार्थिव अंत्यदर्शानासाठी ठेवण्यात येणार आहे. यानंतर दुपारी १ वाजता त्यांच्या अंतयात्रेला सुरुवात होईल. शेवटी मुंबईतील वर्सोवा येथील स्मशानभूमीत त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. सध्या ज्येष्ठ गायक हरिहरन, सलीम मर्चंट यांसह अनेक दिग्गज केके यांच्या अंतिम दर्शनासाठी त्यांच्या निवासस्थानी पोहोचले आहेत. (Hariharan, Salim Merchant And Others Arrive At KK's Mumbai Residence for Anti Darshan)

हे देखील पाहा -

गायक कृष्ण कुमार कुन्नथ म्हणजेच केके (KK) यांचे मंगळवारी रात्री कोलकाता येथे हृदयविकाराचा झटक्याने निधन झाले. त्यांच्या निधनामुळे (Death ) त्यांच्या चाहत्यांवर शोककळा पसरली आहे. देशसहित जगभरातील त्यांचे चाहते त्यांना श्रद्धांजली वाहत आहेत. केके यांच्याकडून नव्या पिढीच्या गायकांना (Singer ) खूप प्रेरणा मिळाली आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : मतमोजणी केंद्राबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी

Bachchu Kadu : विधानसभा निकालाआधी बच्चू कडूंना मोठा दिलासा, कोर्टाकडून निर्दोष सुटका, नेमकं प्रकरण काय?

Shukra Shani Yuti: पुढच्या महिन्यात होणार शुक्र-शनीची युती; 'या' राशींच्या तिजोरीत येणार पैसा

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

SCROLL FOR NEXT