Sanjay Dutt Turns 64 Saam Tv
मनोरंजन बातम्या

Sanjay Dutt Turns 64: बॉलिवूडचा मुन्नाभाई ‘या’ चित्रपटानंतर गेला होता नशेच्या आहारी, वडिलांनी अशी केली व्यसनातून मुक्ती

Sanjay Dutt Birthday: बॉलिवूडला अनेक दमदार चित्रपट देणारा संजय दत्त एकेकाळी अनेक कारणांसाठी चर्चेत राहिला आहे.

Chetan Bodke

Happy Birthday Sanjay Dutt: बॉलिवूडच्या संजू बाबाला खरी ओळख त्याच्या नावाने नाही तर मुन्नाभाई म्हणून जास्त मिळाली. आज संजू बाबाचा वाढदिवस. बॉलिवूडला अनेक दमदार चित्रपट देणारा संजय दत्त एकेकाळी अनेक कारणांसाठी चर्चेत राहिला आहे. अभिनेत्याला त्याच्या फिल्मी करियरमध्ये अनेक अडथळांचा सामना करावा लागला. मात्र इतके अडथळे येऊन देखील त्याने आपली बॉलिवूड इंडस्ट्रीतील ओळख कायम ठेवली.

तरुण वयात असताना संजय दत्तला काही वाईट संगत लागली होती. संजू बाबाला त्या वाईट संगतीमुळे अनेक संकटांना तोंड द्यावे लागले होते. त्यावेळी संजय दत्त त्याच्या वैयक्तिक आयुष्यात ड्रग्स प्रकरणामुळे बराच चर्चेत आला होता. त्याचवेळी मुंबईच्या टाडा कोर्टाने संजयला शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत सहा वर्षांची शिक्षा सुनावली होती. तर, दुसरीकडे संजय दत्तचे अनेक अभिनेत्रींसोबत नाव त्यावेळी जोडलं होतं.

संजय दत्तला त्याच्या सिनेकरकिर्दीत ड्रग्स पायी अनेक चांगले चांगले चित्रपट गेले होते. संजू बाबने ‘रॉकी’ या चित्रपटातून १९८१ मध्ये डेब्यू केलं होतं. या चित्रपटाच्या वेळी संजय दत्तला फारच ड्रग्सचं व्यसन लागलं होतं.

वडील सुनील दत्त त्यावेळी मुलाला लागलेल्या अंमली पदार्थाच्या व्यसनापायी खूपच चिंतेत होते. एकदा स्वतः संजय दत्तने आपल्या वडिलांना ड्रग्जच्या व्यसनाबद्दल सर्व काही सांगितले. त्यानंतर वडील सुनील यांनी संजयला घेऊन यूएस रिहॅबिलिटेशन सेंटर गाठलं.

संजय रिहॅबिलिटेशन सेंटरमध्ये दोन वर्षे राहिला होता. त्यावेळी त्याच्या मनात अनेकदा अंमली पदार्थाच्या नशेचा ही विचार यायच. पण, संजयने मनाचा ठाम विचार केला होता की, ड्रग्ज घेणार नाही आणि कोणाला करूही देणार नाही.

संजयने पहिल्यांदा वयाच्या ९ व्या वर्षी सिगारेट ओढली होती. ज्यावेळी वडील त्याला भेटायला यायचे तेव्हा तो त्याच्या उरलेल्या सिगारेट तिकडेच सोडायचे. वडीलांच्या अपरोक्ष तो व्यसन करायचा. संजू बाबाला अभ्यासात बिल्कुलच अभ्यासात आवड नव्हती.

त्याला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. पण, वडील सुनील यांनी संजयला शिक्षणाची अट घातली होती. संजू बाबाची ही गोष्ट अनेकांना माहित नसेल, तुरुंगात असताना संजयने जेलमधल्या लोकांचे रेडिओ जॉकी बनूनही मनोरंजन केले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

SCROLL FOR NEXT