Sonu Sood News: लोकांना मदत करण्यासाठी प्रेरणा कुठून मिळते? सोनू सूदने सांगितलं प्रेरणास्थान

अभिनेता सोनू सूदने लोकांना मदत करण्यासाठी प्रेरणा कुठून मिळते, याबद्दल एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत भाष्य केलं.
Sonu Sood News
Sonu Sood NewsSaam tv
Published On

Sonu Sood News: बॉलिवूड अभिनेता सोनू सूदने लॉकडाऊनच्या काळात बऱ्याच गरजूंना मदत केली होती. लॉकडाऊन काळात केलेल्या सामाजिक कार्यामुळे सोनू सूदला सोशल मीडियावर खूपच प्रसिद्धी मिळाली. सोनू सूद आजही गरजू लोकांना मदत करत असतो. प्रसिद्ध अभिनेता सोनू सूदने लोकांना मदत करण्यासाठी प्रेरणा कुठून मिळते, याबद्दल एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत भाष्य केलं. (Latest Marathi News)

अभिनेता सोनू सूद रोडीजमध्ये कठोर अवतार दाखवला आहे. तर सिनेमात सोनूने मोठ्या प्रमाणात व्हिलनच्या भूमिका साकारल्या आहेत. व्हिलनच्या भूमिका करणाऱ्या सोन सूदची लॉकडाऊनच्या काळात लोकांना अनोखी बाजू दिसली. सोनू सूदने लॉकडाऊनच्या काळात अनेक गरजू लोकांना मदत केली. लॉकडाऊन काळात केलेल्या मदतीमुळे त्याने सगळ्यांची मने जिंकली.

Sonu Sood News
TRP Rating Of Marathi Serials : 'आई कुठे काय करते'ची घसरण; स्टार प्रवाहावरील मालिकाच ठरली अव्वल

लोकांच्या मदतीसाठी धावून जाणाऱ्या सोनू सूदची लॉकडाऊन काळानंतर एक नवी ओळख निर्माण झाली आहे. याच सोनू सूदने नुकतीच एएनआयला मुलाखत दिली.

या मुलाखतीत सोनूला प्रश्न विचारण्यात आला की, लोक तुम्हाला मसिहा बोलतात, तेव्हा कसं वाटतं, या प्रश्नावर भाष्य करताना सोनू सूद म्हणाला,'खरं तर मला लाज वाटते. मी पुस्तक लिहिलं होतं की, मी मसिहा नाही. आई-वडिलांचं आशीर्वाद घेऊन स्वप्न साकारण्यासाठी उतरलेला व्यक्ती आहे. मला कधी-कधी लाज वाटते. पण सामान्य व्यक्तींशी जोडून राहणे महत्वाची गोष्ट आहे. मी सामान्य व्यक्तींना नेहमी सांगत असतो, मी मसिहा नाही. मी तुमच्यापैकी एक आहे'.

तर तुम्हाला लोकांना मदत करण्यासाठी प्रेरणा कुठून मिळते, या प्रश्नावर उत्तर देताना सोनू सूद म्हणाला, 'आशेवर संपूर्ण जग टिकलं आहे. कोणी एखादा व्यक्ती मोठ्या आशेने मदत मागण्यासाठी येत असेल तर, तेव्हा समानधारकरक वाटतं.

'आजही लोक मोठ्या आशेने मदत मागत असतात. देशभरातून लोक माझ्या घरी मदत मागायला येतात. लोक रांगा लावून माझी भेट घेण्यासाठी आतूर असतात. माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत जग बदलण्याचा प्रयत्न करत राहीन', असेही तो म्हणाला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com