Aai Kuthe Kay Karte TRP Rating : टीव्हीवरील मालिका पाहणारा मोठा वर्ग आहे. या मालिका प्रेक्षकांच्या दैनंदिन जीवनाचा भाग आहे. काही मालिका प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतात. तर काही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस येत नाहीत. मालिकांचं हे अवलोकन आपल्याला मालिकांच्या टीआरपी रेटिंगवरून समजते. मालिकांच्या टीआरपी रेटिंगची यादी समोर आली आहे.
टीआरपी म्हणजे टेलिव्हिजन रेटिंग पाँईट. टीआरपीमुळे मालिकेची लोकप्रियता अंकात मोजली जाते. मालिका किती लोक बघतात? कोणत्या प्लॅटफॉर्मवर बघतात? किती वेळ बघतात? या सर्व गोष्टींवर मालिकेचा टीआरपी अवलंबून असतो. त्यामुळेच अनेक मालिका टीआरपीच्या स्पर्धेत टिकण्यासाठी प्रयत्न करत असतात.
प्रत्येक आठवड्याला मालिकेचा टीआरपी हा बदलत असतो. टीआरपीवर मालिका किती रंजक बनवायची गरज आहे हे ठरवलं जात. सध्या अनेक मालिका टीआरपीच्या स्पर्धेत धावताना दिसत आहे. या आठवड्याच्या टीआरपीच्या स्पर्धेत पहिल्या ८ क्रंमाकावर स्टार प्रवाह वाहिनीवरील मालिका आहे. (Latest Entertainment News)
टीआरपीच्या स्पर्धेत पहिल्या क्रंमाकावर 'ठरलं तर मग' ही स्टार प्रवाहवरील मालिका आहे. 'ठरलं तर मग' मालिकेचा कथानक हा खूप वेगळा आहे. त्यामुळे प्रेक्षक आवर्जून ही मालिका पाहत असतात.
काही दिवसांपूर्वीच या मालिकेने २०० भागांचा टप्पा पार केला. २०० भागानिमित्त मालिकेच्या टीमने सिद्धिविनायकचे दर्शन घेतले. त्यांचे हे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. कमी कालावधीत या मालिकेने खूप जास्त लोकप्रियता मिळवली आहे.
टीआरपीच्या स्पर्धेत 'आई कुठे काय करते' या मालिकेने दुसरा नंबर पटकावला आहे. आई कुठे काय करते ही मालिका प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय आहे. ३ वर्षात या मालिकेच्या लोकप्रियतेचा आलेख सतत उंचावताना दिसत आहे. आईवर आधारित असलेली ही मालिका प्रेक्षकांना त्यांच्या आजूबाजूला घडत आहे असे वाटते.
टीआरपीच्या यादीत स्टार वाहिनीवरील मालिका टीआरपीच्या स्पर्धेत अव्वल ठरल्या आहेत. या यादीत कलर्स मराठीवरील अनेक मालिकांपैकी 'भाग्य दिले तू मला' या मालिकेचा समावेश आहे. तर झीवरील 'दार उघड बये' , 'चला हवा येऊ द्या' , 'तू चाल पुढं' या मालिका अगदी शेवटच्या स्थानावर आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.