Cinema Piracy : सिनेमांच्या पायरसीबाबत सरकारचं मोठं पाऊल, दंडासह तुरुंगवासाचीही तरतूद; राज्यसभेत विधेयक मंजूर

Cinematograph Amendment Bill : पायरसीला आळा घालण्यासाठी राज्यसभेत विधेयक मंजूर करण्यात आले आहे.
Cinema Piracy
Cinema PiracySaam Tv
Published On

Movie Piracy : सध्या बेकायदेशीर वेबसाईटवर पायरसीच्या माध्यमातून चित्रपट किंवा वेबसीरीज प्रदर्शित करण्याचं प्रमाण वाढताना दिसत आहे. पायरसीमुळे चित्रपटांचे व्हिडिओ आणि फोटो लिक होतात. या परिणाम चित्रपटांवर होताना दिसतो. पायरसीला आळा घालण्यासाठी राज्यसभेत विधेयक मंजूर करण्यात आले आहे.

पायरसी म्हणजे एखादा चित्रपट किंवा त्यातील काही चित्रे किंवा सीन लिक करणे. एखाद्या चित्रपटाचे काही सीन लिक झाले तर त्याचा चित्रपटाला खूप फटका बसतो. चित्रपट इंडस्ट्रीला मदत व्हावी म्हणून पायरसीला रोखण्यासाठी दुरुस्ती विधेयक राज्यसभेत मंजूर करण्यात आले आहे.

Cinema Piracy
Actress Prioritize Their Career: मातृत्वाच्या सुखापेक्षा करिअरला प्राधान्य देणाऱ्या अभिनेत्री; वाचा संपूर्ण यादी

सिनेमॅटोग्राफ कायदा,१९५२ मध्ये सुधारणा करणारे विधेयक राज्यसभेत मंजूर केले आहे. नवीन कायद्यांमुळे चित्रपटांची पायरसी करण्यांना चांगलाच चाप बसणार आहे. चित्रपटांची पायरसी करणाऱ्यांवर सरकारने ठोस पावले उचलायला सुरवात केली आहे. आता चित्रपट किंवा वेब सीरीजची पायरेटेड कॉपी बनवणाऱ्यांना जास्तीत जास्त तीन वर्षांचा तुरुंगवास आणि चित्रपटाच्या खर्चाच्या ५% दंड भरावा लागणार आहे.

सिनेमॅटोग्राफ दुरुस्ती विधेयक २०२३ मध्ये चित्रपटांना असलेला १० वर्षांचा वैधता कालावधी काढून टाकून कायमस्वरूपी वैधता असलेल्या चित्रपटांना प्रमाणपत्रे देण्यास सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन (CBFC) परवानगी देण्याचाही प्रस्ताव आहे.

Cinema Piracy
Aai Kuthe Kay Karte: अनिशने केला अरुंधतीचा विश्वासघात; ईशाच्या लग्नाने देशमुख-केळकर कुटुंबात वादाची ठिणगी

या विधेयकात 'UA' श्रेणी अंतर्गत तीन आयु-आधारित प्रमाणपत्रे सादर करण्याची तरतूद आहे, म्हणजेच 'UA 7+', 'UA 13+' आणि 'UA 16+' आणि CBFC ला टेलिव्हिजनवर किंवा अन्य माध्यमात प्रदर्शित होणाऱ्या सिनेमांना वेगळे प्रमाणपत्र प्रदान करण्याचा अधिकार देण्यात आला आहे.

चित्रपट पायरसीला आळा घालण्यासाठी, या विधेयकात सिनेमॅटोग्राफ कायद्यामध्ये नवीन कलमांचा समावेश करण्याचा प्रस्ताव आहे, ज्यामध्ये चित्रपटांचे अनधिकृत रेकॉर्डिंग (कलम 6AA) आणि त्यांचे प्रदर्शन (कलम 6AB) प्रतिबंधित करण्याची तरतूद आहे. 6AA अंतर्गत डिव्हाइसमध्ये चित्रपट किंवा त्याच्या कोणत्याही भागाच्या रेकॉर्डिंगवर बंदी घालण्यात आली आहे.

Cinema Piracy
Onkar Bhojane Video: टॅलेंटची आमच्या गावभर चर्चा... अभिनेता ओंकार भोजनेची आणखी एक कविता व्हायरल

पायरसी म्हणजे नक्की काय?

सोप्या भाषेत सांगायचं तर पायरसी म्हणजे चोरी. चित्रपटांच्या सीनचे व्हिडिओ किंवा फोटो अनधिकृत पद्धतीने लिक करणे म्हणजे चित्रपटांची पायरसी करणे. चित्रपटांची पायरसी होऊन ते चित्रपट बेयकायदेशीरपणे वेबसाईटवर अपलोड केले जातात. त्यामुळे लोक चित्रपट मोबाईवर पाहण्यास पसंती देतात. त्यामुळे थिएटरमध्ये येऊन चित्रपट पाहणारा प्रेक्षक कमी होतो. याचा फटका चित्रपटाच्या कमाईवर होताना दिसतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com