Boney Kapoor Birthday Saam Tv
मनोरंजन बातम्या

Boney Kapoor Birthday : पहिल्याच भेटीत प्रेम, बोनी कपूर आणि श्रीदेवीची फिल्मी लव्हस्टोरी

Boney Kapoor- Sridevi Lovestory: बोनी कपूर हे नेहमीच त्यांच्या प्रोफेशनल टू पर्सनल लाईफमुळे चर्चेत राहिले. बोनी कपूर यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांची लव्हलाईफबद्दल माहिती घेऊया.

Manasvi Choudhary

बॉलिवूडचे सुप्रसिद्ध निर्माते बोनी कपूर आज आपला ६९ वा वाढदिवस साजरा करत आहे. बोनी कपूर हे नेहमीच त्यांच्या प्रोफेशनल टू पर्सनल लाईफमुळे चर्चेत राहिले. आज बोनी कपूर यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांची लव्हलाईफबद्दल माहिती घेऊया.

बोनी कपूर यांचे पहिले लग्न मोना शौरी कपूरसोबत झाले होते. या दोघांना अर्जुन कपूर आणि अंशुला कपूर ही दोन मुले देखील आहेत. मात्र, याच काळात बोनी कपूर यांच्या आयुष्यात एका अभिनेत्रीची एण्ट्री झाली ती अभिनेत्री म्हणजेच दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी.

श्रीदेवीला पहिल्यांदा बघितल्यानंतर बोनी कपूर हे प्रेमात पडले होते. पुढे त्यांनी त्यांच्या मिस्टर इंडिया चित्रपटासाठी तिलाच घेण्यावर ठाम होते. यानंतर त्यांची पहिली भेटही चित्रपटाच्या सेटवर झाली. यावेळी बोनी कपूर श्रीदेवीच्या तुटक हिंदी आणि इंग्रजी भाषेने प्रभावित झाले होते. मिस्टर इंडिया चित्रपटाने बोनी कपूर यांना खरी ओळख मिळवून दिली. दरम्यान या चित्रपटापासूनच बोनी कपूर आणि श्रीदेवी यांच्यातील जवळीक वाढली.

प्रेमात पडल्यानंतर काही दिवसांनंतर बोनी कपूर यांनी श्रीदेवी यांनी प्रपोज केला. मात्र यावेळी श्रीदेवी नाराज झाली होती. काही महिने तिने बोलणं देखील बंद केले होते. मात्र श्रीदेवीची आई आजारी पडली आणि तेव्हा बोनी न सांगता आले आणि मदत केली. त्यानंतर चार वर्षानंतर श्रीदेवीने बोनी कपूर यांच्या प्रेमाला होकार दिला यानंतर श्रीदेवी आणि बोनी कपूर यांनी १९९६ फिल्म इंडस्ट्रीतील काही मोजक्या लोकांमध्ये बोनी कपूर यांच्याशी लग्न केले. बोनी कपूर आणि श्रीदेवी यांनी जान्हवी आणि खुशी या दोन मुली आहे. यानंतर २०१८ मध्ये श्रीदेवी यांचे निधन झाले.

Plane Crash : ओडिशात भयंकर विमान दुर्घटना, ९ जणांना घेऊन जाणारे प्लेन क्रॅश

महाराष्ट्र हादरला! नवऱ्याने आधी बायकोला दगडाने ठेचून मारलं, त्यानंतर विष प्यायला; ४ निरागस मुले पोरकी

Maharashtra Live News Update : नाना भानगिरे यांनी लुटला प्रचारादरम्यान क्रिकेट खेळण्याचा आनंद

Skin Care : त्वचेवर दुधावरील साय लावल्याने काय नुकसान होते ? जाणून घ्या

Hair Spa: पहिल्यांदा हेअर स्पा करायचा विचार करताय? मग टाळा या सामान्य चुका

SCROLL FOR NEXT