Govinda Saam Tv
मनोरंजन बातम्या

Govinda: गोविंदाला सुनितासोबत लग्नच करायचे नव्हते; 'या' अभिनेत्रीच्या प्रेमात होता वेडा, साखरपुडाही मोडलेला, पण...

Govinda: बॉलिवूड अभिनेता गोविंदाने ‘या’ अभिनेत्रीच्या प्रेमात सुनीता आहुजासोबतचा साखरपुडा मोडल्याचा धक्कादायक खुलासा केला. पण त्या कारणामुळेनंतर त्याला सुनीतासोबत लग्न करावं लागलं.

Shruti Vilas Kadam

Govinda: अभिनेता गोविंदा आणि त्याची पत्नी सुनीता आहुजा गेल्या काही काळापासून त्यांच्या नात्याबद्दल चर्चेत आहेत. सुनीता यांनी गोविंदावर अनेकदा अभिनेत्रींसोबत अफेअर केल्याचे आरोप केले आहेत. तसेच, गोविंदानेही स्वतः एकदा प्रेमात वेडा झाल्याची कबूली दिली होते.

नीलम कोठारीवर प्रेम होत...

गेल्या वर्षी अभिनेता गोविंदा आणि सुनीता आहुजाच्या घटस्फोटाच्या अनेक बातम्या समोर आल्या होत्या. या जोडप्याने या अफवांना पूर्णपणे नकार दिला. अलीकडेच सुनीता यांनी पुन्हा गोविंदावर अफेअर केल्याचा आरोप केला आहे. यामुळे चाहत्यांना पुन्हा त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाल्याचा संशय आहे. पण, एक वेळ अशी आली जेव्हा गोविंदाने स्वतः त्याच्या प्रेमाची घोषणा केली. स्टारडस्ट मासिकाला दिलेल्या मुलाखतीत, अभिनेत्याने अभिनेत्री नीलमवर प्रेम असल्याचे सांगितले होते.

सुनीतासोबतचा त्याचा साखरपुडा मोडला पण...

या मुलाखतीत गोविंदाने खुलासा केला की तो नीलमवर प्रेम करतो आणि तिच्याशी लग्न करू इच्छित होता, परंतु सुनीतासोबतचे त्याचे लग्न आधीच ठरले होते. नीलमसाठी त्याने सुनीतासोबतचा त्याचा साखरपुडा तोडला. पण, गोविंदाच्या आईला सुनीता सून म्हणून पसंत होती म्हणून गोविंद आणि नीलम एकत्र येऊ शकले नाहीत. शेवटी, अभिनेत्याला त्याच्या आईला दिलेले वचन पूर्ण करण्यासाठी आणि तिच्या भीतीमुळे सुनीताशी लग्न केले.

तो सुनीताला नीलमसारखे बनायला सांगायचा

संभाषणादरम्यान, गोविंद म्हणाला, "मी सुनीताशी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. मी हे नाते टिकवत होतो. पण मला नीलम कोठारीबद्दल एक विशेष आकर्षण होते. मला माहिती होते की इतक्या लहान वयात प्रसिद्धी आणि नाव मिळवूनही ती अगदी साधी होती. मी माझ्या मित्रांना, कुटुंबाला आणि तिच्या आजूबाजूच्या सर्वांनासमोर नेहमीच तिचे कौतुक केले आहे. मी सुनीताला नीलमसारखे बनण्यास सांगितले." हे ऐकून सुनीताला वाईट वाटायचं आणि म्हणायची, "मी जशी आहे तशीच राहीन आणि तू मला असेच प्रेम केलं पाहिजेस."

गोविंदा सुनीताचे नाते

सुनीतासोबतच्या त्याच्या नात्याबद्दल, गोविंदाने सांगितले की, तो त्यावेळी उत्तम काम करत होता आणि डेट करण्यासाठी मुलगी शोधत होता. एके दिवशी, त्याचा मोठा भाऊ सेटवर आला. त्या दिवशी त्याचे एक रोमँटिक शूट शेड्यूल होते, पण तो ते व्यवस्थित करू शकला नाही. त्याच्या भावाने त्याला सल्ला दिला की कलाकारांनी कोणाशी तरी प्रेमसंबंध ठेवावे जेणेकरून त्यांना असे सीन करण्यास सोयीस्कर वाटतील. गोविंदा पुढे म्हणाला, "माझ्या भावाचा हा सल्ला ऐकल्यानंतर, मी सुनीताला भेटलो आणि मला त्याची मोठी किंमत मोजावी लागली."

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP कार्यकर्त्याच्या वडिलांचा मृत्यू, सरकारी शाळेची पोलखोल करणं जीवावर बेतलं; धक्कादायक घटनेने खळबळ

'मुन्नाभाई MBBS' फेम बॉलिवूड अभिनेत्याच्या कारचा गोव्यात भीषण अपघात; बाप-लेकाला उडवलं, VIDEO व्हायरल

Appendix cancer: पोट फुगीमागे लपलाय अपेंडिंक्सचा कॅन्सर? 'ही' 5 लक्षणं दिसली तर समजा सुरुवात झालीये

UGC NET 2026: ३ विषयांची फेरपरीक्षा होणार; प्रश्नपत्रिकेतील गोंधळानंतर NTA ची मोठी घोषणा

Maharashtra News Live Update: अमरावतीच्या बेलोरा विमानतळावरून नवीन विमानसेवेची प्रतीक्षा

SCROLL FOR NEXT