Yashvardhan Ahuja Bollywood Debut: सध्या प्रसिद्ध बॉलीवूड स्टार गोविंदा त्याच्या चित्रपटांपेक्षा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त चर्चेत आहे. गोविंदाची पत्नी सुनीता आहुजा हिच्या मुलाखती व्हायरल दिसत आहे. या मुलाखतीदरम्यान अभिनेत्याच्या पत्नीने अनेक खुलासे केले. त्यानंतर गोविंदाने एक विधान जारी केले होते. आता सध्या गोविंदाचा मुलगा यशवर्धन आहुजा बॉलिवूडमध्ये प्रवेश करणार आहे. यशवर्धन आहुजाच्या पदार्पणाच्या चित्रपटाबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे.
यशवर्धन आहुजाच्या पदार्पणाची तयारी
अभिनेता गोविंदा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. त्याचे कारण गोविंदाचा लाडका मुलगा यशवर्धन आहुजा आहे. यशवर्धन आहुजाच्या बॉलिवूड पदार्पण करणार आहे. बॉलिवूड हंगामाच्या वृत्तानुसार, "लापता लेडीज" (२०२४) साठी प्रसिद्ध असलेल्या नितांशी गोयल आता यशवर्धन आहुजासोबत पुढील चित्रपटात झळकणार आहे. दिग्दर्शक साजिदच्या पुढील चित्रपटाचे चित्रीकरण २३ जानेवारी रोजी सुरू झाले. सध्या या चित्रपटाचे नाव "हंड्रेड" आहे. एकता कपूर आणि शोभा कपूरची बालाजी टेलिफिल्म्स देखील यात सहभागी आहेत.
गोविंदाचा कमबॅक
यशवर्धन आहुजाच्या पदार्पणाच्या बातमीने लोकांना आनंद झाला आहे. आता चाहते गोविंदाच्या कमबॅकची आतुरतेने वाट पाहत आहेत. गोविंदाच्या कारकिर्दीबद्दल अपडेट्स येत आहेत. अलीकडेच गोविंदाचा एक व्हिडिओही समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये गोविंदा शाळेत नाचताना दिसला. गोविंदाचा हा व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे.
दिग्दर्शक जखमी
अलीकडेच, मुंबईत शूटिंग दरम्यान साजिद खान जखमी झाल्याची बातमी आली. ही घटना घडली तेव्हा तो एकता कपूरसोबत एका प्रोजेक्टचे शूटिंग करत होता. वृत्तानुसार, त्याचा पाय फ्रॅक्चर झाला आणि त्याला शस्त्रक्रिया करावी लागली. साजिदची बहीण फराह खानने मिडियाला सांगितले की, "शस्त्रक्रिया झाली आहे; तो आता बरा आहे." साजिद खान शेवटचा सलमान खानचा रिअॅलिटी शो "बिग बॉस १६" मध्ये दिसला होता.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.