Tine Ahuja On Govinda Sunita Divorce Saam tv
मनोरंजन बातम्या

Govinda Sunita Divorce: गोविंदा-सुनिताच्या घटस्फोटाच्या चर्चा, मोठ्या लेकीच्या मनात नेमकं काय? स्वतःच सर्वकाही सांगितलं

Tina Ahuja: अभिनेता गोविंदा आणि सुनीता लवकरत घटस्फोट घेणार असल्याच्या बातम्या कालपासून येत आहेत. आता अभिनेत्री टिना आहुजाने तिच्या आई वडीलांच्या घटस्फोटाच्या चर्चांवर प्रतिक्रिया दिली आहे.

Shruti Vilas Kadam

Tina Ahuja: अभिनेता गोविंदा आणि सुनीता हे लवकरत घटस्फोट घेणार असल्याच्या बातम्या कालपासून येत आहेत. आता अभिनेत्री टिना आहुजाने तिचे वडील गोविंदा आणि आई सुनीता आहुजा यांच्या घटस्फोटाच्या चर्चांवर भाष्य करत स्पष्ट केले आहे की या सर्व केवळ अफवा आहेत. तिने यासह तिचे कुटुंब अजूनही एकत्र सुखी आहे असे सांगितले आहे.

हिंदुस्तान टाईम्ससोबत झालेल्या संवादात टिनाने सांगितले की, या सर्व अफवा आहेत". मी या गोष्टींकडे लक्ष देत नाही. मला देवाने एक सुंदर कुटुंब दिलं आहे आणि त्याबद्दल मी खूप आभारी आहे. त्या दोघांनी मला आणि यशला एकत्र चांगल्या संस्कारांसह मोठं केलं आहे. टिनाच्या या स्पष्टीकरणानंतर स्पष्ट झाले आहे की, गोविंदा आणि सुनीता यांच्यातील घटस्फोटाच्या चर्चा अफवा आहेत.

काही दिवसांपासून गोविंदा आणि सुनीता आहुजा यांच्यात दुरावा निर्माण झाल्याची चर्चा जोर धरत होती. इतकंच नव्हे तर सुनीता यांनी कोर्टात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केल्याची माहितीही समोर आली होती. मात्र गोविंदाच्या वकिलांनी या बातम्यांवर प्रतिक्रिया देताना स्पष्ट केलं की, “घटस्फोट होणार नाही. हे सगळं जुनं प्रकरण आहे, आताच्या परिस्थितीशी याचा काहीही संबंध नाही.”

दरम्यान, अहवालांनुसार डिसेंबर २०२४ मध्ये सुनीता आहुजाने बांद्रा फॅमिली कोर्टात घटस्फोटाचा अर्ज दाखल केला होता. त्यात फसवणूक, क्रूरता या मुद्द्यांचा उल्लेख केला होता. पण या अर्जावर पुढील कारवाई झालेली नाही. गोविंदा आणि सुनीता आहुजा यांनी अनेकदा माध्यमांशी बोलताना त्यांच्या नात्यातील दृढ विश्वास आणि प्रेमाचा उल्लेख केला आहे. सुनीता यांनी तर, “तो माझ्याशिवाय राहूच शकत नाही” असं विधान करत या अफवांना पूर्णविराम दिला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

घाटकोपरमध्ये अग्नितांडव! गोल्ड क्रश इमारतीला भीषण आग, रहिवाशांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू|VIDEO

Indian Currency: भारतीय नोटा कशापासून बनवल्या जातात?

Maharashtra Live News Update: ‘जिथे शक्य तिथे युती केली पाहिजे’ - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

SRA Scheme: एसआरए इमारतीत राहताय? ही बातमी तुमच्यासाठीच, सरकारने घेतला मोठा निर्णय

Zilla Parishad Election: धुरळा उडाला! पुणे जिल्हा परिषदेवर 'महिला राज'; ५० टक्के जागा राखीव

SCROLL FOR NEXT