Shikhar Dhawan: 'मेरा पिया घर आया...'; शिखर धवनच्या गर्लफ्रेंडने 'गब्बर'चे बॉलिवूड स्टाईलमध्ये केलं स्वागत, चाहते म्हणाले...

Shikhar Dhawan: शिखर धवन त्याच्या नवीन गर्लफ्रेंडमुळे चर्चेत आहे. टीम इंडियाच्या 'गब्बर'च्या नवीन प्रेयसीचे नाव सोफी शाइन आहे. दोघेही सोशल मीडियावर त्यांचे फोटो आणि मजेदार व्हिडिओ शेअर करत राहतात.
Shikhar Dhawan
Shikhar DhawanSaam Tv
Published On

Shikhar Dhawan: आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर शिखर धवन सोशल मीडियावर नव नविन ट्रेंड करत आहे. भारतीय संघाचा माजी क्रिकेट शिखर धवन त्याची नवीन गर्लफ्रेंड सोफी शाइनसाठी चर्चेत आहे. सोफी आणि शिखर धवनचा एक व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये आयर्लंडमध्ये राहणारी सोफी हिंदी गाणे गाऊन तिच्या धवनचे स्वागत करते. सोफीला हिंदी गाणे गाताना पाहून धवन खूप आनंदी होतो. धवन आणि सोफीचा हा व्हिडिओ काही वेळातच व्हायरल झाला.

शिखर धवनची प्रेयसी सोफी शाइनने बुधवारी तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओमध्ये दिसत आहे की धवनसाठी सोफी दार उघडण्यासाठी जाते. धवन घरात प्रवेश करताच तो सोफीला विचारतो, हाय बेबी...कशी आहेस? यावर सोफी 'मेरा पिया घर आया, ओ राम जी...' हे गाणे म्हणू लागते. सोफी हिंदी गाणे गाताना धवन आनंदाने तिच्या प्रेयसीला मिठी मारतो.

Shikhar Dhawan
Govinda-Sunita: घटस्फोटाच्या बातम्यांदरम्यान सुनीताची नवी मुलाखत व्हायरल; म्हणाली, 'गोविंदावर माझ्याइतके कोणीही प्रेम...'

सोफी आणि धवनच्या व्हिडिओवर ऋषभ पंतची प्रतिक्रिया

क्रिकेटर ऋषभ पंतनेही सोफी आणि धवनच्या या व्हिडिओवर प्रतिक्रिया दिली आहे. पंतने दोन हसणारे इमोजी बनवले आहेत. त्याच वेळी, एका नेटकऱ्याने लिहिले, धवन भाई तिला हिंदी शिकवत आहे वाटतं. दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिले, भाई वहिणीची एक लहान बहीण आहे का?अशा प्रकारे नेटकऱ्यांनी अनेक कमेंट केल्या आणि या व्हिडिओला लाखो लाईक्स दिले आहेत.

Shikhar Dhawan
Akshay Kumar: 'तुमची खूप आठवण येईल...; पंजाबी अभिनेत्याच्या निधनानंतर भावुक झाला अक्षय कुमार, म्हणाला...

सोफी शाइन कोण आहे

सोफी शाइन आयर्लंडची आहे. ती अबू धाबीमधील नॉर्दर्न ट्रस्ट कॉर्पोरेशनमध्येवाइस प्रेसिडेंट आहे. तिने लिमरिक इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून मार्केटिंग आणि मॅनेजमेंटमध्ये पदवी घेतली आहे. आयपीएल २०२४ दरम्यान सोफी शाइन धवनसोबत स्टेडियममध्ये दिसली होती आणि तेव्हापासून यांच्या रिलेशनशिपची चर्चा सुरु झाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com