Govinda Birthday: बॉलिवूडचा 'हिरो नंबर 1' आणि त्याच्या अप्रतिम विनोदाकरिता प्रसिद्ध असलेल्या गोविंदाचा आज वाढदिवस. गोविंदाच्या अनेक चित्रपटातून त्याने प्रेक्षकांचे मनमुराद मनोरंजन करत हसवले आहे. ९० च्या दशकात तो जेव्हा मोठ्या पडद्यावर दिसायचा तेव्हा प्रेक्षक खळखळून हसायचे. आजही कॉमिक टायमिंगच्या बाबतीत त्यांची बरोबरी नाही. त्या काळात त्याने एकट्याने बॉलिवूडच्या तिन्ही खानब्रदर्सला कडवी झुंज दिली. चला तर मग जाणून घेऊया त्याच्या वाढदिवसानिमित्त काही खास गोष्टी...
गोविंदाच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाले तर त्याचे वडील अरुण कुमार आहुजा देखील त्यांच्या काळातील प्रसिद्ध कलाकार होते. त्यांनी जवळपास 30-40 चित्रपटांमध्ये काम केले होते. सोबतच, त्याची आई निर्मला देवी शास्त्रीय गायिका होत्या.
21 डिसेंबर 1963 रोजी मुंबईत जन्मलेल्या गोविंदाने कॉमर्समध्ये पदवी घेत अनेक ठिकाणी नोकऱ्या केल्या. 80 च्या दशकात त्याला एल्विन नावाच्या कंपनीची जाहिरात मिळताच नशीब चमकले. यानंतर 1986 मध्ये 'इलजाम' चित्रपटातून पदार्पण करत पहिल्याच चित्रपटातून तो प्रकाशझोतात आला.
गोविंदा ज्या चित्रपटात प्रमुख भूमिका करायचा तो चित्रपट त्याचा ब्लॉकबस्टर चित्रपट असायचा. गोविंदाने त्यावेळी आजही बॉलिवूडमध्ये प्रसिद्ध असलेले खानब्रदर्स (सलमान खान, शाहरुख खान आणि आमिर खान) जे कधी करु शकले तसे कामं तो त्यावेळी करायचा.
कदाचित भारतीय चित्रपटसृष्टीत वयाच्या २२व्या वर्षी प्रकाशझोतात असलेला तो पहिला अभिनेता असावा. वयाच्या २२व्या वर्षी गोविंदाने एक दोन नाही तब्बल ५० चित्रपट एकाचवेळी साईन करुन ठेवले होते. त्याने संपूर्ण आपल्या कारकिर्दीत १६५ हून अधिक चित्रपटात काम केले आहे.
त्याचे साधारण सर्वच चित्रपटहे हाऊसफुल असायचे. त्यावेळी प्रेक्षक चित्रपटगृहाबाहेर सर्वाधिक जमली की, गोविंदाचा चित्रपट आला, या समजमध्ये असायचे. 'राजा बाबू', 'शोला और शबनम', 'कुली नंबर 1', 'दीवाना मस्ताना', 'बडे मिया छोटे मिया', 'हिरो नंबर 1', 'हसीना मान जाएंगे', 'साजन चले ससुराल', ' दुल्हे राजा' हे त्याचे सर्व चित्रपट सुपरहिट ठरले. गोविंदाच्या वैवाहिक जीवनाबद्दल बोलायचे तर, त्याने 1987 मध्ये सुनीता आहुजासोबत लग्न केले असून त्यांन टीना आहुजा आणि यशवर्धन आहुजा ही दोन मुले आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.