Govinda and Sunita Ahuja Saam Tv News
मनोरंजन बातम्या

सगळीकडे गोविंदा-सुनीताच्या घटस्फोटाची चर्चा; पण पडद्यामागं वेगळंच घडतंय, दोघांचा तो फोटो होतोय व्हायरल

Govinda and Sunita Ahuja: घटस्फोटाच्या अफवांना पूर्णविराम देत गोविंदा–सुनीता गणेश चतुर्थीला एकत्र दिसले. गोविंदाने मुलं टीना आणि यशसाठी लोकांकडून आशीर्वाद मागितले. सुनीता आहुजाने कॉन्ट्रोव्हर्सीबद्दल विचारल्यावर हलकंफुलकं उत्तर दिलं.

Bhagyashree Kamble

  • घटस्फोटाच्या अफवांना पूर्णविराम देत गोविंदा–सुनीता गणेश चतुर्थीला एकत्र दिसले.

  • गोविंदाने मुलं टीना आणि यशसाठी लोकांकडून आशीर्वाद मागितले.

  • सुनीता आहुजाने कॉन्ट्रोव्हर्सीबद्दल विचारल्यावर हलकंफुलकं उत्तर दिलं.

  • गोविंदाने संदेश दिला की बाप्पाच्या आशीर्वादाने कुटुंब नेहमी एकत्र राहील.

गेल्या काही दिवसांपासून अभिनेता गोविंदा आणि त्यांची पत्नी सुनीता अहुजा यांचा घटस्फोटाची होणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र, गणेश चतुर्थीच्या विशेष प्रसंगी गोविंदा आणि सुनीता दोघेही एकत्र माध्यमांसमोर आले. यावेळी त्यांनी सर्वांना गणेशत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहे. यावेळी त्यांनी मुलांसाठीही आशिर्वाद मागितले. काही दिवसांपूर्वीच गोविंदाच्या मॅनेजरने, गणेशोत्सवात हे दांपत्य एकत्र दिसेल असे सांगितले होते. आणि ते खरे ठरल्याचे दिसून आले.

आपण सारे एकत्र राहू - गोविंदा

गणेश चतुर्थी निमित्त गोविंदा आणि सुनीता एकत्र दिसल्या. दोघांनी मरूण रंगाचे कपडे परिधान केले होते. यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना गोविंदा म्हणाला, 'याहून सुंदर आणि खास क्षण असूच शकत नाही. गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने कुटुंबातील सगळ्या अडचणी दूर होतात. तसेच दु:ख नाहीसं होतं'.

'आम्ही प्रार्थना करतो की, आपण सारे मिळून शांततेत आयुष्य व्यतीत करतो. आपण सारे असेच कायम एकत्र राहू', असंही गोविंदा म्हणाला. या प्रसंगी गोविंदाने आपल्या मुलांचा, टीना आणि यशचा उल्लेख केला. 'मी विशेषत: यश आणि टीनासाठी तुमचा आशीर्वाद मागतो. तुम्ही त्यांना साथ आणि आधार द्या. त्यांच्या यशासाठी मी बाप्पाकडे प्रार्थना करतो'.

'तुमचं प्रेम आणि आशीर्वाद त्यांना माझ्याहूनही मोठं नाव मिळवून देईल. लोक आश्चर्यचकित होतील की गोविंदाची मुलं कुठल्याही बाहेरील मदतीशिवाय एवढं मोठं यश मिळवू शकली', असंही गोविंदा म्हणाला.

घटस्फोटाच्या अफवांवर मौन

दरम्यान, घटस्फोटाच्या चर्चेबद्दल थेट काही न बोलता दोघांनीही मौन बाळगलं. मात्र, जेव्हा त्यांना कॉन्ट्रोव्हर्सीबाबत विचारण्यात आलं. तेव्हा सुनीता अहुजा म्हणाल्या, 'तुम्ही इथे कॉन्ट्रोव्हर्सी ऐकायला आलात की, गणपती बाप्पा मोरया म्हणायला आलात?' असं सुनीता अहुजा म्हणाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi Actor : नवीन वर्षात मराठी अभिनेत्याला लॉटरी, आलिशान घरासोबत खरेदी केली कार; पाहा VIDEO

Bank Robbery : सांगलीत बँकेवर धाडसी दरोडा, मध्यरात्री खिडकी तोडून आत शिरले; २२ लॉकरमधील ९ लाख लंपास

Women Haircut Styles : सणासुदीसाठी महिलांकरिता ट्रेंडी हेअरकट्स, पाहा फोटोज

Maharashtra Live News Update: भाजपच्या नगराध्यक्ष प्रणोती निंबोरकर यांनी घेतला पदभार

Rohit Pawar: 'अजित पवार KGF मधील रॉकी भाई'; रोहित पवारांकडून जाहिरसभेत काकांचं कौतुक |Video

SCROLL FOR NEXT