बॉलिवूड चित्रपट निर्मात करण जौहर नेहमीच काहीतरी नवीन कलाकृती सादर करण्याचा प्रयत्न करत असतो. करण जौहरला आजपर्यंत अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. करण जौहरला काही दिवसांपूर्वीच AIMA अवॉर्ड सोहळ्यात डायरेक्टर ऑफ द इअर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यानंतर आता करण जौहरला गोल्ड हाऊसने पुरस्कार जाहीर केला आहे.
'गोल्ड गाला पुरस्कार' प्रतिष्ठित पुरस्कार सोहळ्यांपैकी एक आहे. या कार्यक्रमात करण जौहरला सन्मानित करण्यात येणार आहे. या सोहळ्यात अनेक दिग्गज लोकांचा सन्मान केला जाणार आहे.
११ मे २०२४ रोजी लॉस एंजेलिसच्या डाउनटाउनमधील म्युझिक सेंटरमध्ये हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला अनेक दिग्गज सेलिब्रिटी हजेरी लावणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या वर्षीच्या सोहळ्यात 2024 A100 यादीचे अनावरण केले जाईल. यात गेल्या वर्षाभरातील आशियाई पॅसिफिक संस्कृती आणि समजातील प्रभावशाली बदल घडवणाऱ्या व्यक्तींचा सन्मान केला जाईल.
करण जौहरला मंनोरजन क्षेत्रातील योगदानासाठी 'गोल्ड लेजेंड' (Gold Legend) पुरस्कार देण्यात येणार आहे. ज्या व्यक्तीने आपल्या क्षेत्रात उत्तम कामगिरी केली आहे, त्यांना हा पुरस्कार देण्यात येतो.
करण जौहरच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर, करण जौहरने रॉकी और राणी की प्रेम कहानी या चित्रपटाद्वारे दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले होते. करण जौहरने बॉलिवूडमध्ये अनेक चित्रपटांसाठी दिग्दर्शन आणि निर्मिती केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.