GOAT Box Office Collection  SAAM TV
मनोरंजन बातम्या

GOAT Box Office Collection : GOAT चा डंका! फक्त ३ दिवसात 100 कोटी क्लबमध्ये, थलापती विजयची बॉक्स ऑफिसवर जादू!

Goat Box Office Collection Day 3 : विजय थलपती यांच्या 'गोट' चित्रपटाने अवघ्या काही दिवसातच बंपर कमाई केली आहे. देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट १०० कोटींच्या क्लबमध्ये सामील झाला आहे.

Shreya Maskar

थलपती विजय तमिळ स्टार थलपथी विजयचा 'GOAT' (ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाईम) चित्रपटने प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. या चित्रपटाने अवघ्या तीन दिवसातच बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. अनेक रेकॉर्डसुद्धा ब्रेक केले आहे. या चित्रपटाने 100 कोटींचा टप्पा तीन दिवसात पार केला आहे. विजय थलपती यांच्या 'गोट' चित्रपटाने तमिळ इंडस्ट्रीत (Tamil Film) नवीन विक्रम केले आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, 'गोट' (Goat) चित्रपटाने भारतीय बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी 44 कोटींची कमाई केली. तर दुसऱ्या दिवशी 25.5 कोटींची कमाई केली. आता तिसऱ्या दिवशीही गोट' ने 33 कोटींचा जबरदस्त व्यवसाय केला असून यासोबतच हा चित्रपट 100 कोटींच्या क्लबमध्ये सामील झाला आहे.

रेकॉर्ड ब्रेक कामगिरी

थलपथी विजयच्या (Thalapathy Vijay) 'गोट' या थ्रिलर चित्रपटाने अवघ्या तीन दिवसांत भारतात एकूण 102.5 कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे. यासह, १०० कोटींच्या क्लबमध्ये सामील होणारा हा सर्वात जलद तमिळ चित्रपट ठरला आहे. 'गोट'ने 2024 चा पहिला 100 कोटी रुपयांचा तमिळ चित्रपट बनण्याचा विक्रमही केला आहे. 'गोट' तामिळ, तेलुगू आणि हिंदी या तीन भाषांमध्ये रिलीज झाला आहे. या चित्रपटाने तमिळमध्ये 91 कोटीची केली आहे. तेलुगूमध्ये 6.1 कोटी रुपये आणि हिंदीमध्ये 5.4 कोटी रुपयांची बंपर कमाई केली आहे.

'गोट' हा चित्रपटाचे दिग्दर्शन वेंकट प्रभु आणि थलपथी विजय यांनी केले आहे. हा चित्रपट ५ सप्टेंबर रोजी रिलीज झाला आहे. जगभरात या चित्रपटाने आपली जादू दाखवली आहे. 'गोट'ने जगभरातील बॉक्स ऑफिसवर १०० कोटींचा टप्पा ओलांडला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nagpur : पिकांच्या संरक्षणासाठी तारेत सोडला विद्युत प्रवाह; चारा कापताना झाला घात, विजेच्या धक्क्याने एकाचा मृत्यू

Aamhi Saare Khavayye : खुशखबर! मराठी कुकिंग शो 'आम्ही सारे खवय्ये' येतोय? पाहा VIDEO

Rave Party: रेव्ह पार्टी म्हणजे नेमकं काय?

Maharashtra Live News Update: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांची इच्छा - नितेश राणे

Masala Gobi Recipe : कोबीच्या भाजीला द्या खास ट्विस्ट, मुलं ५ मिनिटांत फस्त करतील टिफिन

SCROLL FOR NEXT