Girija Prabhu-Mandar Jadhav SAAM TV
मनोरंजन बातम्या

Girija Prabhu-Mandar Jadhav : मुसळधार पाऊस अन् गुडघाभर पाणी; मंदार-गिरिजा पोहचलं मालिकेच्या सेटवर, पाहा VIDEO

Girija Prabhu-Mandar Jadhav Video : मराठी अभिनेता मंदार जाधव आणि अभिनेत्री गिरिजा प्रभू यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात दोघे गुडघाभर पाण्यातून वाट काढत मालिकेच्या शूटिंगला पोहचले आहेत.

Shreya Maskar

गेल्या 3-4 दिवसांपासून महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पाहायला मिळत आहे.

मंदार-गिरिजा गुडघाभर पाण्यातून वाट काढत शूटिंगला पोहचले.

मंदार-गिरिजाने सोशल मीडियावर मुसळधार पावसाचा व्हिडीओ शेअर केला आहे.

सध्या महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडताना दिसत आहे. ज्यामुळे शाळांना सुट्टी देखील जाहीर करण्यात आली आहे. सरकार नागरिकांना गरज पडल्यास बाहेर जाण्याचे सांगत आहे. मात्र अनेक जणांना पावसातही आपल्या कामाला पोहचणे महत्त्वाचे आहे. पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. ज्यामुळे गाड्या देखील पावसात अडकलेल्या पाहायला मिळत आहेत.

आता सर्वसामान्यांसोबतच कलाकारमंडळी देखील पाण्यातून वाट काढताना दिसत आहेत. मराठी मनोरंजनसृष्टीतील प्रेक्षकांची आवडती जोडी मंदार जाधव (Mandar Jadhav ) आणि गिरिजा प्रभू (Girija Prabhu) यांनी काल (19 ऑगस्ट)ला सोशल मिडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात पावसाचा हाहाकार आणि त्यांची कामाप्रती निष्ठा पाहायला मिळत आहे. गिरिजा प्रभू आणि मंदार जाधव मुसळधार पावसात प्रवास करताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये दोघेही गुडघाभर पाण्यातून वाट काढत चालताना दिसत आहे.

मंदार जाधव आणि गिरिजा प्रभू सध्या स्टार प्रवाह वाहिनीवरील 'कोण होतीस तू काय झालीस तू' या लोकप्रिय मालिकेत काम करत आहे. मालिकेचे शूटिंग पावसात देखील सुरू आहे. त्यामुळे गिरिजा प्रभू आणि मंदार जाधव गुडघाभर पाण्यातून वाट काढत मालिकेच्या शूटिंग सेटवर पोहचले आहे. दोघेही सुखरूप शूटिंगला पोहचले आहेत. भर पावसातही यांचे काम थांबले नसून ते प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी पावसातही सज्ज आहेत.

मंदार जाधव आणि गिरिजा प्रभूने शेअर केलेल्या व्हिडीओला खूप खास कॅप्शन दिलं आहे. त्यांनी लिहिलं की, "मनोरंजनाला ब्रेक नाही…" त्यांच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे. चाहते त्यांचे कौतुक करत असून त्यांना सुखरूप राहायला आणि काळजी घ्यायला सांगत आहेत. व्हिडीओमध्ये गिरिजा आणि मंदार संपूर्ण भिजलेले दिसत आहेत. तसेच दोघेही पावसाचा आनंद देखील घेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tamhini Ghat Accident : काळाचा घाला! ताम्हिणी घाटात दरड कोसळली, सनरुफ तोडून दगड कारमध्ये पडले, महिलेचा जागीच मृत्यू

Dhaba Style Malai Kofta Recipe: ढाबा स्टाईल मलाई कोप्ता घरी कसा बनवायचा?

Maharashtra Live News Update: शनिवारी ठाण्यातील काही भागात पाणी नाही

Bachchu Kadu: कर्जमाफीसाठी मरायलाही तयार, बच्चू कडू ढसाढसा रडले; पाहा VIDEO

मोठी बातमी! माजी उपमुख्यमंत्र्यांच्या घरात फूट; भावानं धरली भाजपची वाट, शरद पवार गटाला धक्का

SCROLL FOR NEXT