Genelia Deshmukh Shared Halloween Photo Instagram
मनोरंजन बातम्या

Genelia Deshmukh Shared Halloween Photo: डोक्याला आणि हाताला पट्ट्या, देशमुख कुटुंबीयांसोबत घडलंय तरी काय?, रितेशने शेअर केलेला व्हिडीओ चर्चेत

Riteish And Genelia Video: रितेश- जेनिलीयाने चाहत्यांसोबत ‘हॅलोविन’ अंदाजामध्ये एक हटके फोटो शेअर केला आहे.

Chetan Bodke

Genelia Deshmukh Shared Halloween Photo

मराठी फिल्म इंडस्ट्रीसोबतच बॉलिवूडचेही लाडके दादा- वहिनी म्हणून सर्वश्रृत असलेले रितेश- जेनिलीया नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय राहतात. जिनिलीया अनेकदा आपल्या फॅमिलीसोबत रिल्स किंवा व्हिडीओ शेअर करत असते. सध्या अभिनेत्रीने चाहत्यांसोबत ‘हॅलोविन’ अंदाजामध्ये एक हटके फोटो शेअर केला आहे. सध्या तिने शेअर केलेला हा फोटो आणि व्हिडीओ चांगलाच चर्चेत आला आहे.

दरम्यान, जेनिलीयाने इन्स्टाग्राम स्टोरीवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामध्ये जिनिलीया आणि रितेश दोघेही एकत्र दिसत आहे. रितेश जेनिलीयाच्या हाताला बँडेजपट्टी बांधताना दिसत आहे. “रितेश नक्की काय करतोय?” असं कॅप्शन देत तिने हा व्हिडीओ इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आहे.

पुढच्या व्हिडीओमध्ये रितेशच्या मदतीला त्याचे दोन्हीही मुलंही दिसत आहेत. हे तिघंही जेनिलीयाच्या हाताला बँडेज बांधताना दिसत आहे. सध्या सोशल मीडियावर अभिनेत्रीचा हा व्हिडीओ पाहून जेनिलीयाला हेल्थसंबंधित प्रश्न विचारत आहे. ‘जेनिलीयाला नेमकं काय झालंय?’ असा प्रश्न सध्या विचारत आहे.

Genelia Deshmukh Shared Halloween Photo

शेवटी आणि तिसरा फोटो शेअर केला आहे. या शेअर केलेल्या फोटोमध्ये जेनिलीया, रितेश आणि दोन्हीही मुलं त्या फोटोमध्ये दिसत आहेत. त्या फोटोमध्ये रितेशसह त्यांच्या मुलांच्या हाता-तोंडावर पांढऱ्या बँडेज पट्ट्या गुंडाळल्याचं दिसत आहे. अभिनेत्रीने हा फोटो शेअर करताना चाहत्यांसोबत ‘हॅलोविन टाईम’ अशा आशयाचं कॅप्शन दिलं आहे. आणि त्या कॅप्शनच्या खाली रियान आणि राहिलच्या शाळेला तिने टॅग केलं आहे. खरंतर ही प्रमोशनल स्ट्रॅटेजी आहे का ? अशी सध्या सोशल मीडियावर चर्चा होत आहे.

खरंतर ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये दरवर्षी परदेशामध्ये हॅलोवीन पार्टी केली जाते. त्या पार्टीमध्ये हॅलोविन लूक करुन अनेक जण भुतासारखा लूक करतात. या पार्टीमध्ये भूत-प्रेतांची वेशभूषा केली जाते. भारतातही या पार्टीचे अनेक ठिकाणी आयोजन केले जाते. अनेक बॉलिवूड सेलिब्रटीही हा लूक करीत असतात. त्यामुळे हॅलोवीन पार्टीमध्ये शोभेल अशी हटके स्टाईल जिनिलीया आणि तिच्या कुटुंबीयांनी केली आहे. रितेश-जिनिलीयाच्या कामाबद्दल बोलायचे, तर रितेश लवकरच ‘हाऊसफुल्ल ५’मध्ये झळकणार आहे. याशिवाय जिनिलीया शेवटची ‘ट्रायल पीरियड’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tuesday Horoscope : मंगळवार शुभ ठरणार की आव्हानात्मक? आजच वाचा राशीभविष्य

Toilet Scrolling : टॉयलेटमध्ये फोन वापरताय? गंभीर आजाराचा करावा लागेल सामना, अभ्यासात मोठा खुलासा

Nangartas Waterfall : शहराच्या गजबजाटापासून दूर वसलाय नांगरतास धबधबा, पाहता क्षणी ताणतणावातून व्हाल Relax

Maharashtra Live News Update: नजर ठेवण्यासाठी पोलीसांकडून अत्याधूनिक ड्रोनचा वापर

Eye Care: डोळ्यांसाठी सर्वात महत्वाचे आहेत 'हे' व्हिटामिन, ९९% लोकांना माहिती नसेल

SCROLL FOR NEXT