Geeta Kapoor Turns 50  Saam TV
मनोरंजन बातम्या

HBD Geeta Kapoor : हवाईसुंदरी बनण्याचे स्वप्न पाहणारी गीता माँ कशी झाली प्रसिद्ध कोरिओग्राफर ; जाणून घ्या तिचा प्रवास

Geeta Kapoor Turns 50 : करिअरच्या सुरवातीला गीताने बॉलिवूडमधील अनेक गाण्यात बॅकग्राउंड डान्सरचे काम केले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Geeta Kapoor Journey to Become Choreographer : गीता कपूरला अनेक डान्सरची माँ म्हणून ओळखलं जातं. गीता ही एक प्रसिद्ध नृत्यांगणा आणि नृत्यदिग्दर्शिका आहे. गीता कपूर घराघरात ओळखली जाते. गरीब घरात जन्माला आलेली मुलगी ते एका एपिसोडसाठी लाखो रुपये घेणारी गीता कपूर आज ५० वा वाढदिवस साजरा करत आहे. गीताचा या क्षेत्रात येण्याचा मार्ग सोप्पा नव्हता.

छोट्या पडद्यावरील अनेक डान्स शोचे परिक्षण गीता कपूर करते. करिअरच्या सुरवातीला गीताने बॉलिवूडमधील अनेक गाण्यात बॅकग्राउंड डान्सरचे काम केले आहे. पण तीच गीता आज अनेक डान्सरसाठी आईचं रुप आहे. गीता कपूर लहानपणापासूनच डान्स करते. पण गीताला डान्सर व्हायचं नव्हतं. (Latest Entertainment News)

गीताने एअर हॉस्टेस व्हायचं स्वप्न पाहिलं होतं. एअर हेस्टोससाठी तिने ३ वेळा अर्जही केला होता. काही कारणांनी गीताचे हे स्वप्न स्वप्नच राहिलं. त्यानंतर तिचा डान्सच्या विश्वातील प्रवास सुरू झाला. एकदा गीताच्या वडिलांनी फराह खानच्या डान्सचं खूप कौतुक केलं. त्यामुळे गीताला मात्र प्रचंड राग आला. त्यानंतर स्वतःला सिद्ध करण्यासाठी गीताने डान्सर व्हायचं ठरवलं.

एकदा गीताला फराह खानच्या जागी डान्स करायची संधी मिळाली. फराह खान डान्सच्या काही वेळ आधी आजारी पडली. त्यामुळे फराहच्या जागी गीताला रिप्लेस करण्यात आले. या डान्सनंतर मात्र गीताच्या वडिलांनी गीताचं खूप कौतुक केलं. त्यानंतर गीता ही फराहच्या डान्स ग्रुपमध्ये सामील झाली.

वडिलांच्या आजारपणामुळे गीताने नृत्यदिग्दर्शनाची जबाबदारी घेतली. गीताने पैश्यांसाठी घेतलेल्या या निर्णयामुळे मात्र तिचे खूप नुकसान झाले. नृत्यदिग्दर्शिका होण्याच्या प्रयत्नात गीता अयशस्वी ठरली. त्यानंतर गीताने पुन्हा फराह खानचा डान्स ग्रुपला जॉइन केला.

ज्या वेळी गीताने पहिल्यांदा फराह खानचा डान्स ग्रुप जॉइन केला तेव्हा ती १५ वर्षांची होती. त्यावेळी साजिद खानही त्याच ग्रुपमध्ये होता. त्याचदरम्यान साजिद खानने गीताला लग्नासाठी खूपदा विचारले असल्याच्या चर्चा आहेत. पण गीताने त्याला नकार दिला.

गीता कपूर, रेमो डिसूजा आणि टेरेन्स लुईस यांची मैत्री खूप प्रसिद्ध आहे. डान्सच्या जगात या तिघांनीही खूप नाव कमावलं आहे. या तिघांनी डान्सला वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले आहे. गीता कपूर सध्या 'इंडियाज बेस्ट डान्सर' या शोचे परिक्षण करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'Saiyara' तू तो बदला नहीं है... या ट्रेंडींग गाण्याचा अर्थ काय?

Asia Cup 2025 schedule : भारत-पाकिस्तान भिडणार, तारीख ठरली! आशिया चषक स्पर्धेचं संपूर्ण वेळापत्रक

Bhaskargad : मित्रांसोबत नाशिकला गेलाय? 'भास्करगड'ची आवर्जून सफर करा

Maharashtra Live News Update: पोहण्यासाठी गेलेल्या 20 वर्षीच्या तरुणाचा तलावात बुडून मृत्यू,नागपूरमधील घटना

Gautam Gambhir : टीम इंडियाची अवस्था 'गंभीर'; जबाबदार कोण? आकडेवारी चिंता वाढवणारी

SCROLL FOR NEXT