Gautami Patil Video SAAMTV
मनोरंजन बातम्या

Gautami Patil Video : 'फायर ब्रिगेडला बोलवा...'; गौतमी पाटीलचं जबरदस्त आयटम साँग, कातिल अदा पाहून चाहते फिदा

Gautami Patil Item Song : सध्या गौतमी पाटील चांगलीच चर्चेत आहे. नुकतेच गौतमी पाटीलचे नवीन आयटम साँग प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे.

Shreya Maskar

नृत्यांगना गौतमी पाटील तिच्या लावणीमुळे कायम चर्चेत असते. तिच्या गाण्यातील कातिल अदा पाहून चाहते फिदा होतात. तिचा मोठा चाहता वर्ग आहे. आपल्या डान्स आणि अभिनयाने तिने चाहत्यांना वेड लावले आहे. 'वामा - लढाई सन्मानाची' या आगामी मराठी चित्रपटाचा जबरदस्त टिझर नुकताच प्रदर्शित झाला असून तो प्रेक्षकांच्या पसंतीस चांगलाच उतरला आहे.

चित्रपटातील 'फायर ब्रिगेडला बोलवा' हे जबरदस्त आयटम साँग नुकतेच प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. या गाण्याने सोशल मीडिया अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. महाराष्ट्राची लोकप्रिय नृत्यांगना गौतमी पाटील (Gautami Patil ) हिने या गाण्यावर भन्नाट डान्स केला आहे. तिच्या ठसकेबाज अदांनी तिने प्रेक्षकांना वेड लावले आहे.

'फायर ब्रिगेडला बोलवा' गाण्यातील गौतमी पाटीलच्या ठसकेबाज नखरे पाहून चाहते दिवाने झाले आहेत. 'फायर ब्रिगेडला बोलवा' हा गाणे वैशाली सामंतने गायले आहे. सुचिर कुलकर्णी यांचे कमाल संगीत या गाण्याला मिळाले आहे. गाण्याचे बोल तरंग वैद्य यांचे आहेत. गौतमी पाटीलच्या या नवीन गाण्याला चाहत्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. या गाण्यावर चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे. गाण्यामध्ये गौतमीने केशरी रंगाची साडी नेसली आहे.

'वामा - लढाई सन्मानाची' चित्रपटाची कथा स्त्री सन्मान, आत्मगौरव आणि संघर्ष याभोवती फिरते. या चित्रपटात अभिनेत्री कश्मीरा कुलकर्णी प्रमुख भूमिकेत पाहायला मिळणार आहे. तसेच चित्रपटात डॉ. महेश कुमार, गणेश दिवेकर, जुई बी हे कलाकारही झळकणार आहेत. 'वामा - लढाई सन्मानाची' चित्रपटाचे दिग्दर्शक अशोक कोंडके आहेत. तर निर्माते सुब्रमण्यम के आहेत. 'वामा - लढाई सन्मानाची' चित्रपट 23 मे ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

नृत्यांगना गौतमी पाटील सध्या 'शिट्टी वाजली रे' या मराठी कुकिंग शोमध्ये पाहायला मिळत आहे. 'शिट्टी वाजली रे' कार्यक्रमात कॉमेडी आणि पदार्थांची मेजवानी पाहायला मिळत आहे. या कार्यक्रमाला चाहत्यांकडून उत्तम प्रतिसाद मिळतो आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: IIT पवईच्या बाहेर वंचितचा आंदोलन

राज्यातील जिल्ह्यांची संख्या वाढणार? सरकारकडून हालचालींना वेग; 7 तालुक्यांसाठी अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाला मंजुरी

Maharashtra Politics: काँग्रेसला मोठा हादरा, बड्या नेत्याचा शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश

T20 Ranking: टी २० रँकिंगमध्ये भारतीय खेळाडूंचा जलवा! टॉप ५ मध्ये २ तडाखेबंद फलंदाज

Skin Care: ग्लोइंग आणि मॉइश्चराइज स्किनसाठी घरच्या घरी बनवा 'ही' नाईट क्रीम; ५ दिवसांत दिसेल फरक

SCROLL FOR NEXT