नृत्यांगना गौतमी पाटील (Gautami Patil) कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. तिचा मोठा चाहता वर्ग आहे. तिच्या डान्सचे लाखो दिवाने आहेत. तिचा डान्स पाहायला चाहत्यांची कायम गर्दी पाहायला मिळते. नुकतीच तिने इन्स्टाग्रामवर एक खास डान्स रील शेअर केली आहे. ज्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. गौतमी पाटील पावसाचा पुरेपूर आनंद घेताना दिसत आहे.
गौतमी पाटीलने इन्स्टाग्रामवर पावसात भन्नाट डान्स करतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. जो पाहून चाहते फिदा झाले आहेत. या व्हिडीओने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. गौतमी पाटील 'दिल परदेसी हो गया' या चित्रपटातील 'छमछम नाचूंगी' (Chamcham Naachoongi) गाण्यावर भर पावसात रस्त्यावर जबरदस्त डान्स केला आहे.
गौतमीच्या डान्समधील तिचा कातिल अदा पाहून चाहते घायाळ झाले आहेत. या गाण्यावर गौतमी पाटील सुंदर साडी नेसून नाचत आहे. तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव तिच्या मनातला आनंद सांगत आहेत. गौतमी पाटीलच्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की गौतमी पाटीलने केशरी आणि लाल रंगाची साडी नेसली आहे. मोकळे केस आणि मिनिमल ज्वेलरीने तिने हा लूक पू्र्ण केला आहे.
गौतमी पाटीलच्या या डान्स व्हिडीओवर चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे. तिच्या लूकचे आणि डान्सची चाहते कमेंट्समध्ये कौतुक करत आहेत. एका युजरने लिहिलं की, "निसर्गाचं आणि पावसाचं सौंदर्य" गौतमी पाटील सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. आपल्या डान्सचे व्हिडीओ आणि वेगवेगळ्या हटके लूकचे फोटो ती सतत चाहत्यांसोबत शेअर करत असते.
नृत्यांगना गौतमी पाटील सध्या 'शिट्टी वाजली रे' या मराठी कुकिंग शोमध्ये पाहायला मिळत आहे. 'शिट्टी वाजली रे' कार्यक्रमात कॉमेडी आणि पदार्थांची मेजवानी पाहायला मिळते.