Gautami Patil  saam tv
मनोरंजन बातम्या

Gautami Patil : मोकळे केस, काळा गॉगल; अक्षय खन्नाच्या गाण्यावर गौतमी पाटीलनं लगावले ठुमके, पाहा VIDEO

Gautami Patil Dance Video : नृत्यांगना गौतमी पाटीलने 'धुरंधर' चित्रपटातील अक्षय खन्नाच्या व्हायरल गाण्यावर भन्नाट डान्स केला आहे. ज्यावर नेटकरी भरभरून कमेंट्स करत आहेत.

Shreya Maskar

सध्या 'धुरंधर' चित्रपटातील अक्षय खन्नाच्या गाण्यावर चाहते, कलाकार नाचताना दिसत आहे.

गौतमी पाटीलला देखील fa9la गाण्याची भुरळ पडली आहे.

गौतमी पाटील अक्षय खन्नाच्या गाण्यावर थिरकली.

सर्वसामान्यांसोबत कलाकारही 'धुरंधर'च्या गाण्याचा ट्रेंड फॉलो करताना दिसत आहे. 'धुरंधर' चित्रपटातील अक्षय खन्नाचे Fa9la गाणे सध्या सोशल मीडियावर तुफान गाजत आहे. तर गाण्यातील अक्षय खन्नाची हुक स्टेप प्रंचड व्हायरल होत आहे. अलिकडेच बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीने देखील या गाण्यावर भन्नाट डान्स केला होता. नृत्यांगना गौतमी पाटीलला देखील अक्षय खन्नाच्या गाण्याची भुरळ पडली आहे. तिने Fa9la गाण्यावर भन्नाट डान्स केला आहे.

गौतमी पाटील धुरंधर चित्रपटातील अक्षय खन्नाच्या fa9la गाण्यावर डान्स करताना दिसली. गाण्यातील अक्षय खन्नाची व्हायरल हुक स्टेप तिने केली. गौतमीचा स्वॅग खूपच भारी वाटत होता. गौतमीने रस्त्याच्या बाजूला ही डान्स रील शूट केली आहे. ज्याचा व्हिडीओ तिने शेअर केला आहे. साध्या सिंपल कपड्यात गौतमी क्यूट दिसत आहे. मोकळे केस आणि डोळ्यांना गॉगल लावून ती खूप स्टायलिश अंदाजात नाचताना दिसतेय. तिच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

चाहत्यांच्या कमेंट्स

गौतमीच्या व्हिडीओवर 'सबसे कातील गौतमी पाटील', 'मस्त' , 'सुंदर', 'खूपच छान', 'क्यूट मुलगी', 'हिरोईन' अशा कमेंट्स येत आहेत. तसेच या व्हिडीओवर चाहते खूप हार्ट इमोजी देत आहेत.

'धुरंधर' हा ॲक्शन चित्रपट आहे. 'धुरंधर' चित्रपट 5 डिसेंबर 2025 ला थिएटरमध्ये रिलीज झाला. 'धुरंधर' आदित्य धर दिग्दर्शित चित्रपट आहे. कंधार अपहरण आणि २६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यांसह अनेक सत्य घटनांपासून चित्रपट प्रेरित आहे. 'धुरंधर' चित्रपटात रणवीर सिंहसोबत संजय दत्त, अर्जुन रामपाल, सारा अर्जुन, अक्षय खन्ना, आर माधवन, राकेश बेदी हे तगडे कलाकार झळकले आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, 'धुरंधर' चित्रपटाचे बजेट 250 कोटींच्या अधिक आहे. धुरंधर' लवकरच 600 कोटींचा टप्पा गाठेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MS Dhoni आयपीएलच्या किती सामन्यांना मुकणार? का असणार संघाबाहेर?

Bihar Politics: राजकारणातील सर्वात मोठी बातमी! मुख्यमंत्री देणार CM पदाचा राजीनामा

अमेरिकेत ट्रम्पविरोधात 'नो किंग्स' आंदोलन; 90 लाख नागरीक उतरले रस्त्यावर, कारण काय?

'वेलकम टू हेल' इराणचा अमेरिकेला इशारा, इराणची धमकी, जगाला धडकी

राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची पुन्हा चर्चा, दादांच्या राष्ट्रवादीकडून विलिनीकरणाची ऑफर

SCROLL FOR NEXT