Deepali Sayyad: 'कितीही धमक्या येऊ द्या....'; भोंदू अशोक खरातवरील चित्रपटाबाबत अभिनेत्री दीपाली सय्यदची ठाम भूमिका

Deepali Sayyad: भोंदू बाबा अशोक खरात यांच्यावरील चित्रपटामुळे धमक्या आल्याचा दावा अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी केला आहे. कोणत्याही दबावाला न झुकता भूमिका साकारणार असल्याचे सांगितले.
DEEPALI SAYED RECEIVES THREAT CALLS OVER MAHARASHTRA EPSTEIN FILES ROLE
DEEPALI SAYED RECEIVES THREAT CALLS OVER MAHARASHTRA EPSTEIN FILES ROLESaam Tv
Published On

Deepali Sayyad: भोंदू बाबा अशोक खरात यांच्याशी संबंधित चित्रपटामध्ये काम करण्याच्या जबरदस्तीमुळे चर्चेत असलेल्या अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी धमक्यांनंतरही आपली भूमिका बदलणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. कोणत्याही प्रकारच्या दबावाला किंवा धमक्यांना न घाबरता आपण हा चित्रपट पूर्ण करणार असल्याचा ठाम निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.

माध्यमांशी संवाद साधताना दीपाली सय्यद यांनी सांगितले की, अशोक खरात यांच्यावरील चित्रपटात भूमिका स्वीकारल्यानंतर त्यांना काही अज्ञात व्यक्तींकडून धमकीचे फोन आले. मात्र या धमक्यांमुळे त्या मागे हटणार नसून उलट चित्रपट करण्याचा त्यांचा निर्धार अधिकच मजबूत झाला आहे.

DEEPALI SAYED RECEIVES THREAT CALLS OVER MAHARASHTRA EPSTEIN FILES ROLE
Riteish-Raja Shivaji Collection: 'राजा शिवाजी'ची बॉक्स ऑफिसवर ऐतिहासिक घोडदौड सुरुच; २८ व्या दिवशी केली दमदार कमाई

दीपाली सय्यद म्हणाल्या, “मला एक फोन आला होता. काही लोकांकडून दबाव आणण्याचा प्रयत्नही करण्यात आला. पण अशा गोष्टींना मी घाबरत नाही. उलट या प्रकारामुळे मी हा चित्रपट पूर्ण करण्याचा निर्णय अधिक ठामपणे घेतला आहे. सत्य मांडण्याचे काम कलाकार म्हणून आम्ही करत असतो आणि ते करताना कोणत्याही दबावाला बळी पडणार नाही.”

DEEPALI SAYED RECEIVES THREAT CALLS OVER MAHARASHTRA EPSTEIN FILES ROLE
Salman Khan: बॉलिवूडमध्ये रंगला नवा ड्रामा; रणवीर सिंग आणि फरहान अख्तरच्या वादात सलमान खानची एन्ट्री

त्यांनी पुढे सांगितले की, कलाकारांना आपली भूमिका साकारण्याचा आणि समाजासमोर विविध विषय मांडण्याचा अधिकार आहे. पण कितीही धमक्या आल्या तरी आपण चित्रपट करणार आहे. अशा धमक्यांना आपण घाबरत नाही. एखाद्या विषयावर चित्रपट बनवला जात असल्यामुळे धमक्या देणे किंवा दबाव टाकणे योग्य नाही. अशा प्रकारच्या घटनांमुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा येऊ शकते, असेही त्यांनी नमूद केले.

दीपाली सय्यद यांच्या या वक्तव्यानंतर चित्रपटसृष्टीत आणि सामाजिक वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. चित्रपटाच्या विषयामुळे निर्माण झालेला वाद आणि त्यासंदर्भात येणाऱ्या प्रतिक्रिया यामुळे हा प्रकल्प आणखी चर्चेत आला आहे. अशोक खरात यांच्याशी संबंधित कथानकावर आधारित हा चित्रपट नेमका कोणत्या घटनांवर भाष्य करणार, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र चित्रपटाच्या घोषणेनंतरच त्याला मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी मिळाली आहे. तसेच दीपाली सय्यद यांच्या नकारामुळे हा चित्रपटावर आणखी परिणाम पडण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com