Gautami Patil-Bhau Kadam SAAM TV
मनोरंजन बातम्या

Gautami Patil-Bhau Kadam : भाऊ कदम अन् गौतमी पाटीलची जोडी सुपरहिट, दादा कोंडकेंच्या गाण्यावरील झक्कास डान्स पाहून लेकीची खास कमेंट | VIDEO

Gautami Patil-Bhau Kadam First Song : लावणी क्वीन गौतमी पाटील आणि प्रसिद्ध अभिनेते, कॉमेडी किंग भाऊ कदम पहिल्यांदाच एकत्र झळकले आहे. नुकताच त्यांचा नवीन म्युजिक अल्बम रिलीज झाला आहे. वडिलांच्या डान्सवर लेकीने खास कमेंट केली आहे.

Shreya Maskar

भाऊ कदम - गौतमी पाटील पहिल्यांदाच एकत्र झळकले

भाऊ कदम - गौतमी पाटील यांचे नवीन गाणे रिलीज

भाऊ कदम यांच्या लेकीची खास कमेंट

लावणी क्वीन गौतमी पाटील पुन्हा एकदा आपल्या डान्समुळे चर्चेत आली आहे. गौतमी पाटील आता प्रसिद्ध मराठी अभिनेते भाऊ कदम यांच्यासोबत झळकली आहे. दोघांचं नवीन गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. या गाण्यावर भाऊ कदम यांच्या मुलीने म्हणजेच मृण्मयी कदम हिने खास कमेंट करून आपल्या वडिलांचे भरभरून कौतुक केले आहे.

भाऊ कदम - गौतमी पाटील सुपरहिट जोडी

पहिल्यांदाच भाऊ कदम आणि गौतमी पाटीलही सुपरहिट जोडी प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. नुकतेच यांचे 'हिल हिल पोरी हिला…' हे गाणे प्रदर्शित झाले आहे. या गाण्याला चाहत्यांकडून भरपूर प्रेम मिळत आहे. हे गाणे दादा कोंडके यांच्या 'हिल हिल पोरी हिला...' या गाण्याचा सुंदर रिमेक व्हर्जन आहे. हे गाणे दादा कोंडके यांच्या 'आंधळा मारतो डोळा' या चित्रपटातील आहे. 'हिल हिल पोरी हिला...' हे गाणे गायक रोहित राऊत आणि गायिका सोनाली सोनावणे यांनी आपल्या सुरेल आवाजात संगीतबद्ध केले आहे.

भाऊ कदम यांच्या लेकीची कमेंट

भाऊ कदम यांची लेक परदेशात शिकत असून जॉबही करत आहे. तिने गाण्याच्या व्हिडीओवर खूपच खास कमेंट केली आहे. तिने लिहिले की, "गाणं खूप आवडलं...एकदम मस्त! या गाण्यावर कधी डान्स करतेय असं झालंय..."

gautami patil bhau kadam

भाऊ कदम - गौतमी पाटील दोघेही 'हिल हिल पोरी हिला...' गाण्यात खूपच सुंदर आणि हटके लूकमध्ये दिसत आहेत. एका लूकमध्ये गौतमीने लाल रंगाची सुंदर नऊवारी साडी नेसली आहे आणि भाऊ कदमने दादा कोंडके स्टाइल लूक केला आहे. डान्समध्ये दोघांचीही भन्नाट केमिस्ट्री पाहायला मिळत आहे. सध्या सोशल मीडियावर हे गाणे तुफान व्हायरल होताना दिसत आहे. या गाण्यावर चाहते आणि कलाकार मंडळी कमेंट्सचा आणि प्रेमाचा वर्षाव करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : अकोला जिल्ह्यात बजाज फायनान्सविरोधात वंचित बहुजन आघाडीचे लोटांगण आंदोलन

Garba Special Blouse Designs: नजरेत भरेल असं सौंदर्य! गरब्यासाठी लेहेंग्यावर उठून दिसतील असे 5 बॅकलेस ब्लाऊज

भाजपला मोठा धक्का! गोपीचंद पडळकरांचा उमेदवारी अर्ज रद्द; राजकारणात खळबळ|VIDEO

Kidney health: तुमच्या किडनीला होऊ शकतो धोका; या ७ वाईट सवयी आताच सोडा, अन्यथा...

शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी सरकारचा मास्टर प्लॅन; जिल्हाधिकाऱ्यांवर मोठी जबाबदारी

SCROLL FOR NEXT