Alyad Palyad Collection Saam Tv
मनोरंजन बातम्या

Alyad Palyad Collection : गौरव मोरेच्या 'अल्याड पल्याड'ची बॉलिवूड चित्रपटांना टक्कर, आठवड्यातच कमाई कोटींच्या पल्याड

Alyad Palyad Box Office Collection : 'अल्याड पल्याड' चित्रपट बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई करताना दिसत आहे. मल्टिस्टारर हॉरर-कॉमेडी 'अल्याड पल्याड' चित्रपटाने सहा दिवसांत कोट्यवधींची कमाई केलेली आहे.

Chetan Bodke

बॉक्स ऑफिसवर दर शुक्रवारी अनेक भाषेतील चित्रपट रिलीज होत असतात. नुकताच मराठी आणि बॉलिवूडमध्ये वेगवेगळ्या धाटणीचे चित्रपट रिलीज झालेले आहेत. सध्या 'अल्याड पल्याड' चित्रपट बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई करताना दिसत आहे. मल्टिस्टारर हॉरर-कॉमेडी 'अल्याड पल्याड' चित्रपटाने सहा दिवसांत कोट्यवधींची कमाई केलेली आहे. जाणून घेऊया चित्रपटाच्या एकूण कमाईबद्दल...

सॅकल्निक ट्रेड ॲनालिस्टनुसार चित्रपटाने एका आठवड्यांत १ कोटी ७५ लाखांची कमाई केलेली आहे. चित्रपटाने पहिल्या दिवशी १ लाख, दुसऱ्या दिवशी २ लाख, तिसऱ्या दिवशी ३७ लाख, चौथ्या दिवशी २४ लाख, पाचव्या दिवशी १५ कोटी तर सहाव्या दिवशी १५ कोटींची कमाई केलेली आहे. अशी एकूण भारतात चित्रपटाने १ कोटी २१ लाखांची कमाई केलेली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चित्रपटाने जगभरात १ कोटी ३६ लाखांची कमाई केलेली आहे. सध्या सर्वच स्तरातून चित्रपटाचे कौतुक केले जात असून कलाकारांच्याही अभिनयाचे चाहते कौतुक करीत आहेत.

'मुंज्या' आणि 'चंदू चॅम्पियन' हे दोन हिंदी चित्रपट बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई करत असताना दुसरीकडे मराठी चित्रपट 'अल्याड पल्याड' बॉक्स ऑफिसवर चांगली टक्कर देत आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर १४ जून २०२४ ला रिलीज झालेला आहे. चित्रपटाची निर्मिती शैलेश जैन आणि महेश निंबाळकर यांनी केली असून दिग्दर्शन प्रीतम एस के पाटील यांचे आहे. मकरंद देशपांडे, गौरव मोरे, संदीप पाठक, सक्षम कुलकर्णी, सुरेश विश्वकर्मा, चिन्मय उदगीरकर, भाग्यम जैन, अनुष्का पिंपुटकर आदि कलाकारांच्या भूमिका ‘अल्याड पल्याड' चित्रपटात आहेत.

मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या जीवनपटावर आधारित 'संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील' चित्रपट १४ जूनला रिलीज झालेला आहे. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दिलासादायक कमाई केलेली नाही. सॅनसिल्कच्या रिपोर्टनुसार, चित्रपटाने एका आठवड्यात जेमतेम ५४ लाखांची कमाई केलेली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Muharram : मोहरमच्या आनंदावर विरजण, आगीत हनुमंतचा मृत्यू; काळजात धस्स करणारी घटना

GK: टोमॅटो अन् बटाटापेक्षा स्वस्त काजू! जाणून घ्या भारतातील 'हे' अनोखे ठिकाण

Pimpri Chinchwad : हिंजवडीच्या पुरस्थितीनंतर पीएमआरडीएचे कठोर पाऊल; चार जणांवर केला गुन्हा दाखल

Thane : ५६९ जणांचा व्हॉट्सअॅप ग्रुप, मनसैनिकाची शिंदेंविरोधात आक्षेपार्ह पोस्ट, ठाण्याचा शिवसैनिक खवळला

Shweta Tiwari Life : श्वेता तिवारीने १२ व्या वर्षी केली कामाला सुरूवात, मिळायचे 'इतके' पैसे

SCROLL FOR NEXT