Munjya Collection : मराठमोळ्या दिग्दर्शकाच्या ‘मुंज्या’ची बॉक्स ऑफिसवर तुफान क्रेझ, जाणून घ्या चार दिवसांतली कमाई

Munjya Box Office Collection : आदित्य सरपोतदार दिग्दर्शित ‘मुंज्या’ चित्रपट नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार सुरुवात केली असून चित्रपटाची जोरदार चर्चा होत आहे.
Munjya Collection : मराठमोळ्या दिग्दर्शकाच्या ‘मुंज्या’ची बॉक्स ऑफिसवर तुफान क्रेझ, जाणून घ्या चार दिवसांतली कमाई
Munjya Box Office CollectionSaam Tv

बॉक्स ऑफिसवर वेगवेगळ्या धाटणीचे चित्रपट रिलीज होत आहेत. उत्तम कथानक असलेल्या चित्रपटांची सध्या बॉक्स ऑफिसवर जोरदार चर्चा सुरु आहे. अशातच नुकताच बॉक्स ऑफिसवर आदित्य सरपोतदार दिग्दर्शित ‘मुंज्या’ चित्रपट रिलीज झालेला आहे. या हॉरर कॉमेडी चित्रपटाची सध्या बॉक्स ऑफिसवर चांगलीच चर्चा होताना दिसत आहे.

शर्वरी वाघ आणि अभय वर्मा चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत आहे. या दोघांच्याही अभिनयाचे चाहते चांगलेच कौतुक करीत असून चाहत्यांना चित्रपटाचे कथानक भावले आहे, जाणून घेऊया चित्रपटाने प्रदर्शनाच्या चौथ्या किती कमाई केलेली आहे.

Munjya Collection : मराठमोळ्या दिग्दर्शकाच्या ‘मुंज्या’ची बॉक्स ऑफिसवर तुफान क्रेझ, जाणून घ्या चार दिवसांतली कमाई
Noor Malabika : ३७ वर्षीय अभिनेत्री नूर मालाबिकाने आयुष्य संपवलं, पोलिसांनी सांगितलं आत्महत्येचं कारण

Sacknilkच्या रिपोर्टनुसार, 'मुंज्या' चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी ४ कोटींची कमाई, दुसऱ्या दिवशी ७ कोटी २५ लाखांची कमाई, तिसऱ्या दिवशी ८ कोटी तर चौथ्या दिवशी ३.७५ कोटींची कमाई केलेली आहे. चित्रपटाने पहिल्या चार दिवसांतच २३ कोटींची कमाई केलेली असून चित्रपट प्रेक्षकांना प्रचंड भावला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, या चित्रपटाची निर्मिती ३० कोटींच्या आसपास झालेली आहे. चित्रपटाचा खर्च एका आठवड्यातच वसुल होण्याची शक्यता आहे. हा चित्रपट VFX वर आधारित असून भारतातील पहिला CGI (कॉम्प्युटर जनरेटेड इमेजरी) चित्रपट आहे.

हॉरर कॉमेडी चित्रपटाचे दिग्दर्शन आदित्य सरपोतदार यांनी केले असून चित्रपटाची निर्मिती ‘स्त्री’ चित्रपटाचे निर्माते मॅडॉक फिल्म्सने केली आहे. चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेत अभय वर्मा, शर्वरी वाघ, मोना सिंग आहेत. तर सुहास जोशी, रसिका वेंगुर्लेकर, भाग्यश्री लिमये आणि शर्वरी वाघ हे मराठमोळे सेलिब्रिटी ही प्रमुख भूमिकेत आहेत.

Munjya Collection : मराठमोळ्या दिग्दर्शकाच्या ‘मुंज्या’ची बॉक्स ऑफिसवर तुफान क्रेझ, जाणून घ्या चार दिवसांतली कमाई
Anil Kapoor: करण जौहर, सलमान खान नव्हे तर अनिल कपूर करणार बिग बॉस OTT 3 होस्ट; शोचा नवा प्रोमो आउट

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com