
मुंबई : मुंबईतील ओशिवारा भागात मालाबिका दास नावाच्या अभिनेत्रीने जीवनं संपवलं. मालाबिकाने या आधी कतार एअरलाइन्समध्ये एअर हॉस्टेस म्हणूनही काम करायची. त्यानंतर तिने सिनेसृष्टीत काम सुरु केलं होतं. नूर मालाबिकाचा मृतदेह तिच्याच घरात कुजलेल्या अवस्थेत आढळला. नूरचा मृतदेह कुजल्यामुळे शेजारी राहणांऱ्या लोकांना दुर्गंध येऊ लागला होता. त्यानंतर शेजारी राहणाऱ्या लोकांनी पोलिसांना माहिती दिली.
पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून माबालिकाच्या घराचा दरवाजा तोडला. त्यानंतर नूर मालाबिकाचा मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवला. या अभिनेत्रीचे पूर्ण नाव नूर मालाबिका दास असल्याचं सांगण्यात येत आहे.
ओशिवारा पोलिसांच्या माहितीनुसार, अभिनेत्री नूर ही मागील अनेक महिन्यांपासून नैराश्यात होती. नैराश्य दूर होण्यासाठी नूर औषधाचंही सेवन करत होती. सुरुवातीच्या तपासानुसार, मालाबिकाने नैराश्यातून आयुष्य संपवल्याचे स्पष्ट होत आहे. या प्रकरणी पोलिसांनी एडीआर रिपोर्ट दाखल केला आहे.
नूर मालाबिका दास मूळची आसामची राहणारी होती. नूर आधी एअर होस्टेस म्हणून काम करत होती. त्यानंतर तिने अभिनय क्षेत्रात पाऊल टाकलं. ३७ वर्षांच्या अभिनेत्रीने अनेक हिंदी सिनेमा आणि वेब सीरीजमध्ये काम केले आहे.
उल्लू ओटीटी चॅनलच्या प्रसिद्ध शो चरमसुखमध्येही काम केलं आहे. या व्यतिरिक्त 'सिस्किया', 'तिखी चटनी', 'हलचल' आणि 'देखी अनदेखी'मध्येही काम केलं आहे.
तिने काजोल सोबतही 'द ट्रायल' या वेबसीरीजमध्येही काम केलं आहे. नूर सोशल मीडियावर सक्रिया असायची. त्याचे सोशल मीडियावर १ लाख ६० हजारांहून अधिक फॉलोवर्स आहेत. नूरच्या मृत्यूनंतर चाहत्यांकडून दु:ख व्यक्त करण्यात येत आहे.
नूरच्या मृत्यूनंतर तिच्या चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे. चाहते तिच्या जुन्या पोस्टवर प्रतिक्रया देत आहेत. अनेक जण तिच्या आठवणींना उजाळा देत आहेत. नूर सोशल मीडियावरून तिच्या चाहत्यांसोबत संपर्कात राहायची.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.